‘कोरोना मोदींमुळे देशात आला, मोदी पाकिस्तानला लस पुरवतात मात्र राज्यांना देत नाहीत’

पंढरपुर | पंढरपुर मंगळवेढामध्ये सध्या पोटनिवडणूकीचं वारं वाहू लागलं आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमधील अनेक मोठे नेते प्रचारासाठी पंढरपुर मंगळवेढामध्ये ठाण मांडून बसले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजप नेत्यामंध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. समाधान अवताडे निवडून आल्यावर ते देश विकायला काढतील असं म्हणतं त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

“मोदी महाराजांनी जनता कर्फ्यूच्या नावाखाली थाळ्या वाजवायला सांगितल्या. या काळात मुस्लिम समाजामुळे कोरोना पसरतो असं सांगून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आपले शत्रू असलेल्या पाकिस्तानला लस पुरविली जात आहे. मात्र राज्यांना लसी दिल्या जात नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “२०१९ मध्ये आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला. भाजप सरकारच्या काळात पंढरपुरचा नव्हे तर फडणवीसांचा विकास झाला आहे.” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून समाधान आवताडेंना रिंगणात उतरवण्यात आले आहे. येत्या काळात जनता कोणाच्या पारड्यात मतं टाकतात आणि गूलाल कोण उधळतयं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस म्हणजे चंद्रकांत पाटील”
“राष्ट्रवादी हुशार, गृहमंत्री गरीब तोंडाचा पाहतात, ज्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला”
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! संचारबंदीत ‘या’ दोन सेवाही अत्यावश्यक सेवेत
“ज्यांनी घराघरात भांडणं लावून घरं फोडली, त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.