लक्षात ठेवा! ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा

मुंबई : संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी युपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याचे वक्तव्य केले होते. यावरून राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत काय शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, असे प्रश्न विचारला होता.

याचाच धागा पकडत राऊतांनी युपीए हा राष्ट्रीय स्तरावरील विषय राज्य स्तरावरील, जिल्हास्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये, असे सुनावले होते. आता यावर पटोले यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

‘संजय राऊत हे काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी, असा रोखठोक इशारा पटोले यांनी दिला आहे.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. पुढ बोलताना ते म्हणाले, ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवावी.’ राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ‘सामना’चे संपादक आहेत हे माहिती आहे. परंतु ते पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.

शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे तपासण्याची गरज….
‘शरद पवार शिवसेनेत की राष्ट्रवादीत आहेत  हे तपासण्याची गरज आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहे हे आम्हाला माहिती आहे.  परंतु अलीकडच्या काळात आम्हाला त्यांचे नवे रूप पाहायला मिळत आहे, असे म्हणत पटोले यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

तसेच पुढे ते म्हणाले, ‘संजय राऊत म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते  किंवा शरद पवारांचे प्रवक्त्यासारखे ते वागत आहेत. जे या युपीएचा हिस्साच नाही त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये, असा सल्लाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“मोदीजी अजून किती फेकणार?, हद्द झाली राव”

आमदारांनी महावितरण अभियंत्यांना खुर्चीला बांधलं; वाचा संपूर्ण प्रकरण

सोनं खरेदीची सुवर्णसंधी! गेल्या महिन्याच्या तुलनेत ५ हजार रुपयांनी स्वस्त सोनं, जाणून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.