Homeताज्या बातम्या‘’कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या पाहिल्यानंतर मोदींनी आपली नौटंकी सुरू केली, ते दिल्लीला परतले’’

‘’कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या पाहिल्यानंतर मोदींनी आपली नौटंकी सुरू केली, ते दिल्लीला परतले’’

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबद्दल चरणजित सिंह चन्नी यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याचवेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांनी याला पीएम मोदींची नौटंकी म्हटलं आहे.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे. 5 जानेवारीला दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाहन भटिंडा ते हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारक फिरोजपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर 15-20 मिनिटे उभे होते. यादरम्यान आंदोलक त्यांच्या ताफ्यासमोर आले होते.

या सर्व कारणांमुळे पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्यक्रमाला न जाता दिल्लीला परतले. या संदर्भात भाजप पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचा आरोप करत आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, ही सर्व पीएम मोदींची नौटंकी आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधानांना एसपीजीने ठरवलेल्या मार्गाने जावे लागले. मात्र कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या पाहिल्यानंतर त्यांनी आपली नौटंकी सुरू केली. जी त्यांची सवय आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. एक सोडून तीन तीन केंद्रिय गुप्तचर यंत्रणा आहेत. सगळ्या गोष्टींची माहिती घेतली जाते. केंद्रिय गृहखात्याच्या कंट्रोलमध्ये सगळं असतं.

कालची जी घटना घडली त्यामध्ये पंजाब सरकार जबाबदार आहे. अशा पद्धतीचं भासवून पुन्हा एका नौटंकीचा आधार घेऊन पाच राज्यांमध्ये निवडणुका जिंकता येतात का? हा प्रयत्न भाजपच्या वतीने सुरू आहे. खरंतर या घटनेमागे केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांचादेखील हात तर नाही ना? हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. याप्रकरणी आता सहानुभूती घेण्याचे काम भाजप करत असल्याचे पटोले म्हणाले.

पटोले यांच्याशिवाय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनीही पीएम मोदींची रॅली पुढे ढकलल्यानंतर एका ट्विटमध्ये हाऊज द जोश असे विधान केले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटले की, आम्हाला माहित आहे की काँग्रेस मोदींचा द्वेष करते.

त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना नुकसान करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे पीएम मोदींच्या ताफ्याच्या सुरक्षेचा विषय आहे तर दुसरीकडे काँग्रेस नेते जल्लोष करत होते. हाऊज द जोश विचारत आहेत. हा कोणत्या प्रकारचा उत्सव आहे? असं स्मृती ईराणी म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या
मोदींच्या सुरक्षेतील ढिसाळपणावर बाॅलीवूड कलाकार संतापले; म्हणाले, लाज वाटली पाहीजे…
पंजाबात पंतप्रधानांचा रस्ता अडवनारे आंदोलक भाजपचेच? ‘तो’ व्हिडीओ समोर आल्याने उडाली खळबळ
११ वर्षांपूर्वी शेंगा विकणाऱ्याने फुकटात दिल्या होत्या शेंगा, भावा-बहिणीने अमेरिकेतून येऊन फेडले कर्ज
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा ३१ व्या वर्षी अचानक झाला मृत्यु, मनोरंजनविश्वात उडाली खळबळ