Foxconn : आज फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेला, उद्या मुंबईही गुजरातकडे गेल्यास त्यात काही नावीन्य वाटू नये, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केली आहे. महाराष्ट्रातील वेदांत समूह आणि फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातकडे गेला आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, “२०१४ ते २०१९ च्या काळात ज्यावेळी फडणवीसांचे सरकार होते त्यावेळी इंटरनॅशनल फायनान्स सेंटरसुद्धा गुजरातला हलवण्यात आले होते. आपल्या महाराष्ट्रातील पाणी गुजरातला देण्याचे काम झाले. हिरे व्यापारसुद्धा गुजरातला देण्यात आला आणि आता आज फॉक्सकॉनदेखील गुजरातला देण्यात आलं.”
जवळपास ५ ते १० हजार तरुणांना त्याठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु, आज एवढं मोठं फॉक्सकॉनसारखं युनिट गुजरातला देण्यात आलं असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकाच्या काळात ज्या काही योजना निर्माण झाल्या होत्या. त्या सगळ्या योजना गुजरातला नेण्याचा हा एक प्रयत्न होता, असेही ते म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, “काही दिवसानंतर मुंबईसुद्धा गुजरातला नेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न असेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये सांगितले की, आमचे आदर्श मोदी आणि शहा आहेत. याचाच अर्थ गुजरातला सगळं दान करण्याचा निर्णय ईडी भाजप सरकारने केला आहे.”
“महाराष्ट्रातील ईडीचे भाजपप्रणित सरकार महाराष्ट्राला लुटून गुजरातला मोठं करण्याचा प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्राच्या जनतेची धोकाधडी भाजपच्या वतीने केली जात आहे, हे यातून सिद्ध होते.” असे ते म्हणाले. तसेच “भाजपचे सरकार हे कोणाच्या इशाऱ्यावर चालते हे काल मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद येथील सभेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे नाममात्र आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहाच महाराष्ट्राचे सरकार चालवतात हे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
“मॉक्सकॉनसारखा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची बेईमानी करण्याचे काम राज्याच्या ईडी भाजपप्रणित सरकारने केले आहे. म्हणूनच उद्या मुंबईसुद्धा गुजरातमध्ये गेली तर यात नवल वाटू नये. हे षडयंत्र मोदी आणि शहांनी तयार केलं असल्याचे स्पष्ट झाले आहे,” असे म्हणत नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
रुग्ण आॅपरेशन थिएटरमध्ये, ट्रॅफीकमध्ये अडलेला डॉक्टर कार तशीच सोडून तीन किमी धावला अन् पुढे..; वाचा नेमकं काय घडलं?
Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर
Foxconn: वेदांताच्या स्पर्धेत फक्त तीन राज्य होती मग गुजरात आले कुठून? देसाईंनी सांगीतली अंदर की बात
Nanded : मामाने भाच्याला मुलगी देण्यास नकार दिला ; भाच्याने मामालाच संपवले