शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे – नाना पटोले

मुंबई : युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी नाराजी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांनी आपला संबंध नाही त्या विषयात पडू नये असा सल्ला दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘शरद पवार शिवसेनेत की राष्ट्रवादीत आहेत हे तपासण्याची गरज आहे. राऊत हे शिवसेनेचे खासदार आहे हे आम्हाला माहिती आहे. परंतु अलीकडच्या काळात आम्हाला त्यांचे नवे रूप पाहायला मिळत आहे, असे म्हणत पटोले यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

तसेच पुढे ते म्हणाले, ‘संजय राऊत म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते किंवा शरद पवारांचे प्रवक्त्यासारखे ते वागत आहेत. जे या युपीएचा हिस्साच नाही त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये, असा सल्लाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहे. जर आमच्या नेत्यांवर टीका करायची असेल तर मग आम्हालाही विचार करावा लागणार हे आम्ही निश्चितपणे त्यांना ठणकावून सांगणार आहे, असेही पटोले यांनी म्हंटले आहे.

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले….
संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलं असून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे असे म्हटले आहे. तसेच या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी भाष्य केल्यास आपण त्यांना उत्तर देऊ असेही सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“होय रे बाबा घेतली मी लस, पण फोटो काढला नाही”, अजित पवारांचा टोला

नाही नाही म्हणत अखेर मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलाच; कोरोना रोखण्यासाठी रविवारपासून संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी

दीपाली चव्हाण आत्महत्या! रात्री-बेरात्री बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.