“मोदीजी अजून किती फेकणार?, हद्द झाली राव”

मुंबई : बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिले आंदोलन होते. त्यावेळी मला अटकही झाली होती, अशी आठवण मोदींनी सांगितली. यावरून काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला आहे. “मोदीजी अजून किती फेकणार?, हद्द झाली राव” असे म्हणत कॉंग्रेसने निशाणा साधला आहे.

‘और कितना फेकोगे मोदीजी… हद्द झाली राव..! शेतकरी आंदोलनावरून तुमच्या तोंडू एक शब्दही निघत नाही आणि स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यासाठी बांगलादेशमध्ये जात आहात. शेतकऱ्यांना तुम्ही आंदोलनजीवी म्हटलं होतं. आता तुम्ही कोण झालात? ढोंगीजीवी?, असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी…
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी 20 ते 22 वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

बांगलादेशला 20 लाख कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला. या कठीण प्रसंगात बांगलादेशप्रमाणे अनेक देशांच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा राहिला. यापुढेही बांगलादेशला कोरोना लसीचा पुरवठा केला जाईल, असे मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या 

आमदारांनी महावितरण अभियंत्यांना खुर्चीला बांधलं; वाचा संपूर्ण प्रकरण

सोनं खरेदीची सुवर्णसंधी! गेल्या महिन्याच्या तुलनेत ५ हजार रुपयांनी स्वस्त सोनं, जाणून घ्या

पारंपारिक शेती सोडून केली ‘या’ भाज्यांची लागवड, आता करतोय लाखोंची कमाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.