Share

Nana Patekar : “या माणसावर एकही डाग नाही, कुठलंही किटाळ नाही”; नाना पाटेकरांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाले..

Nana Patekar : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात. साताऱ्यात पार पडलेल्या ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांच्यावर भरभरून प्रेम व्यक्त केलं. या कार्यक्रमात दोघेही उपस्थित होते आणि त्यांच्या मैत्रीच्या आठवणी नानांनी खुल्या दिलाने सांगितल्या.

“शिंदे साहेबांचं चारित्र्य स्वच्छ, डागमुक्त” – नाना पाटेकर

शिंदे यांचं वर्णन करताना नाना पाटेकर(Nana Patekar) म्हणाले, “या माणसावर एकही डाग नाही. कुठलंच किटाळ नाही. हे जपणं फार अवघड आहे. मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर देखील कोणी बोट दाखवू शकत नाही, यापेक्षा मोठं काय असू शकतं?” त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि अजित पवार(ajit pawar) यांचाही उल्लेख करत, “देवेंद्र माझा चांगला मित्र आहे, अजितसुद्धा आहे,” असं सांगितलं.

“साध्या कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास माझ्या डोळ्यांसमोर”

नाना पाटेकर यांनी खुलासा केला की, “मी एकनाथ शिंदे यांना त्या वेळपासून ओळखतो, जेव्हा ते एक सामान्य कार्यकर्ते होते. त्यांचं सातत्य, नम्रता आणि साधेपणा आजही तसाच आहे. कपड्यांमध्ये थोडा फरक पडतो, पण माणूस तोच राहिलाय. असे मित्र असणं ही आनंदाची गोष्ट आहे.”

कार्यक्रमात त्यांच्या मनातली आपुलकी आणि जुनी मैत्री यांची झलक पाहायला मिळाली.

दरम्यान, नाना पाटेकर लवकरच ‘हाउसफुल्ल ५’ या बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार असून, चाहते त्यांच्या या कमबॅकसाठी उत्सुक आहेत.
nana-patekar-praised-eknath-shinde-said

राजकारण ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now