फक्त ७५० रुपयांमध्ये केले होते नाना पाटेकर यांनी लग्न; वाचा त्यांची हटके लव्ह स्टोरी

बॉलीवूडमध्ये गाजलेल्या प्रेम कहाण्यांबद्दल आपल्या सर्वांनाच माहीती आहे. पण काही प्रेम कहाण्या पडद्यामागे घडतात. ज्या खुप कमी लोकांना माहीती असतात. अशीच एक प्रेम कहाणी नाना पाटेकर आणि त्यांच्या पत्नी निलकांती यांची आहे.

मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर यांनी प्रेम कहाण्या केल्या. पण त्यांच्या खऱ्या आयूष्यातील प्रेम कहाणीबद्दल खुप कमी लोकांना माहीती आहे. नाना सुरुवातीपासूनच त्यांच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल जास्त बोलत नाहीत.

त्यामूळे खुप कमी लोकांना माहीती आहे की, नाना पाटेकर विवाहीत असूनही त्यांची पत्नी नीलाकांतीपासून दुर राहतात. त्यांचा घटस्फोट झाला नाही. पण तरीही ते दोघे वेगळे राहतात. नाना पाटेकर यांना मल्हार हा मुलगा आहे.

नाना त्यांच्या पत्नीपासून दुर राहत असले तरी ते अनेकदा त्यांना भेटण्यासाठी जातात. ते दोघे एकमेकांना भेटून एकत्र टाईम घालवतात. नाना आणि नीलाकांतीचे लग्न फक्त ७५० रुपयांमध्ये झाले होते. त्यावेळी नाना खुप मोठे अभिनेते नव्हते. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती.

त्यांना करिअरच्या सुरुवातली एका शोसाठी ५० रुपये मिळायचे. ५० रुपयांमध्येच त्यांना सगळा खर्च चालायचा. त्यामूळे त्यांनी त्यांचे लग्न खुप कमी खर्चात केले होते. लग्नानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना खुप मदत केली. त्यांचे करिअर पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी नेहमी त्यांच्यासोबत होत्या.

पण ९० च्या दशकामध्ये नाना पाटेकर आणि त्यांच्या कोस्टार्सच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. अभिनेत्री आयशा टाकियासोबत नाना पाटेकरचे नाव जोडले जाऊ लागले. त्यानंतर अभिनेत्री मनीषा कोईरालासोबत त्यांचे नाव जोडले गेले.

नाना पाटेकरच्या अफेअरच्या बातम्यांमूळे त्यांच्या वैवाहिक आयूष्यात अडचणी येत होत्या. त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमूळे त्यांच्या पत्नीसोबत त्यांचे वाद होत होते. शेवटी त्यांच्या पत्नीने वेगळ होण्याचा निर्णय घेतला. त्या नाना पाटेरपासून वेगळ राहू लागल्या.

एवढ्या वर्षांनंतरही हे दोघे वेगळे राहतात. पण त्यांचा घटस्फोट झाला नाही. नानांनी स्वत एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा स्वीकार केला होता. ते म्हणाले होते की, ‘आम्ही अनेक वेळा एकमेकांना भेटत असतो. आम्ही एकत्र टाईम घालवतो आणि एकमेकांची काळजी घेतो’.

महत्वाच्या बातम्या –

आररर खतरनाक! व्हॅलेंटाइन्सला बॉयफ्रेंडने दिला धोका, मग काय गर्लफ्रेंडने घातला शहरात धिंगाणा

जाणून घ्या मिलिंद गवळी यांची खरी लव्ह स्टोरी; लग्नासाठी ठेवली होती ‘ही’ अट

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: वाचा धकधक गर्ल माधूरी दीक्षित आणि श्रीराम नेनेची लग्नानंतरची हटके लव्ह स्टोरी

…म्हणून कपूर कुटुंबाने जेष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची शोकसभा घेतली नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.