सोलापूरची चादर अमेरिकेत देतीय उब, निक जोनासचे चादरीपासून बनवलेला शर्ट घालून फोटोशूट

चादर म्हटले की पहिले नाव समोर येते ते म्हणजे सोलापूर. सोलापुरची चादर सगळीकडे प्रसिद्ध आहे. देशात अनेक ठिकाणी या चादरीला मोठी मागणी असते. मात्र आता ही चादर जगभरात पोहोचली आहे. आता अमेरिकन गायक आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनस याने याच सोलापुरी चादरपासून बनवण्यात आलेला ड्रेस घातला आहे.

त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निक जोनस याने या कपड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामुळे याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. सेंट लुईसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या कपड्यांनी उब दिली असे म्हणत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत.

यामुळे आता ही चादर सातासमुद्रापार गेली आहे, या चादरेवर सोलापुरातील चाटला टेक्स्टाईल इंडिस्ट्रीजचा लोगो दिसत आहे. याबाबत कंपनीचे मालक गोवधर्न चाटला म्हणाले की, याबाबत अनेकजण फोन करून माहिती विचारत होते, चादर जगभरात पोहोचल्याने त्यांचे कौतूक करत आहेत.

या कंपनीत दरवर्षी फॅशन डिजाईन शिकणारे विद्यार्थी इंटनर्शिपसाठी येत असतात. तसेच देशभरात देखील चादरचे डिलर आहेत. यामुळे ही चादर जगभरात पोहोचली आहे. अनेक ठिकाणी याची विक्री होते. अनेकजण कौतुक देखील करत असतात.

आता त्यांच्यामाध्यमातून ही चादर निक यांच्यापर्यंत पोहोचली असावी अशी माहिती गोवर्धन चाटला यांनी दिली. यामुळे भारतीय असलेली ही चादर आता अमेरिकेत देखील पोहोचली आहे. याचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.