मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण

‘छोटी सी उम्र, बडे-बडे खिताब…हुस्न की वो मल्लिका, शोहरत बेहिसाब’ हे शब्द टिव्हीची क्वीन शिवांगी जोशीवर शोभून दिसतात. टेलिव्हिजनवरील सर्वात युवा अभिनेत्रींपैकी एक शिवांगी जोशी लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. छोट्या वयातच शिवांगीला खुप जास्त यश मिळाले आहे.

शिवांगी २६ वर्षांची झाली आहे. स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून तिला घराघरात ओळख मिळाली होती. पहीले नायका आणि आत्ता सिरत बनून तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सध्या शिवांगी मालिकेच्या शुटींगसाठी गुजरातला गेली आहे.

शिवांगीचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. ती सध्याच्या घडीला टेलिव्हिजनवरील टॉपची अभिनेत्री आहे. असे बोलले जाते की, शिवांगी मालिकेच्या एका एपिसोडसाठी ४५ हजार रुपये घेते. म्हणजेच तिची महिन्याची कमाई लाखो रुपयांमध्ये आहे. आज शिवांगी छोट्या वयात करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे.

शिवांगी जोशी १८ करोडची मालकिण आहे. २०१९ मध्ये तिने पहील्यांदा तिची ड्रीम कार खरेदी केली होती. या कारची किंमत करोडोंमध्ये आहे. शिवांगीचा जन्म देहराडूनमध्ये झाला होता. तिला जेव्हा पण कामातून वेळ मिळतो तेव्हा ती देहराडूनला जाते.

शिवांगी जोशी तिच्या कुटूंबासोबत मुंबईतील पॉश भागात खुप आलिशान घरात राहते. शिवांगीच्या घराची किंमत कोरोडोंमध्ये आहे. तिने अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मुंबईत घर घेतले आहे. ती तिच्या कुटूंबासोबत मुंबईत राहते. शिवांगी तिच्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिसोबत खुप क्लोज आहे.

शिवांगीने तिच्या घरातील सजावट आई वडीलांच्या पसंतीने केली आहे. त्यामूळे तिच्या घरातील प्रत्येक कोपरा तिच्यासाठी खास आहे. शिवांगी अनेकदा तिच्या घरामध्ये स्टाईलिश फोटोशूट करते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते खुप पसंत करतात.

शिवांगी फक्त अभिनय आणि मालिकेमूळेच नाही तर लव्ह अफेअर्समूळे देखील अनेकदा चर्चेत असते. एक काळ होता जेव्हा शिवांगी तिचा को स्टार मोहसिन खानसोबतच्या अफेअरमूळे चर्चेत होती. मालिका सुरु झाल्यापासून शिवांगी आणि मोहसिनच्या लव्ह अफेअर्सच्या चर्चा सुरु होत्या.

पण काही दिवसांपूर्वीच शिवांगी आणि मोहसिनचे ब्रेकअप झाले. मोहसिनने स्वत या गोष्टीबद्दल चाहत्यांना माहीती दिली होती. मोहसिनच्या अगोदर तिचे नाव अभिनेता विशाल आदित्य सिंहसोबत जोडले गेले होते. पण हे नातं जास्त काळ टिकू शकले नाही. सध्या शिवांगी सिंगल आहे.

महत्वाच्या बातम्या –
सलमान खान, रणबीर कपूरनंतर विक्की कौशलवर फिदा झाली कतरिना; लवकरच करणार लग्न?
गीता कपूरने खरच गुपचूप लग्न केले का? स्वत: गीतानेच केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, सत्य..
‘हे’ आहेत बॉलीवूड चित्रपटातील विदेश खलनायक; एक तर होता ईरानी अभिनेता
टेलिव्हिजनवरील जोधा बाई आज दिसते ‘अशी’; ओळखणे झाले आहे कठिण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.