फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ड्रग्स पार्टी करत होती ही प्रसिद्ध अभिनेत्री; पोलिसांच्या छापेमारीत अटक

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रीटी ड्रग्स प्रकरणावरुन चर्चेत येत असतात. असे असतानाच आता प्रसिद्ध अभिनेत्री नायरा नेहल शाहा ही ड्रग्स प्रकरणावरुन चर्चेत आली आहे. पोलिसांनी तिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायरा एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिच्या वाढदिवसानिमित्त ड्रग्सपार्टी कर होती. त्यावेळी पोलिसांनी छापेमारी करत पोलिसांनी तिला अटक केले आहे. सांता क्रुज पोलिस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायरा एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपली बर्थडे पार्टी सेलिब्रेट करत होती, पण ही काही साधी पार्टी नव्हती, तर ड्रग्सपार्टी होती. ही माहिती कोणीतरी पोलिसांना पोहचवली. त्यामुळे पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा मारत नायराला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पहाटे तीन वाजता या हॉटेलवर छापेमारी केली होती. यावेळी पोलिसांनी नायराला ड्रग्ससोबत अटक केली आहे. नायरा ही चित्रपटातील आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

सांता क्रुज पोलिसांनी नायराच्या विरोधात एनचीपीएस एक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नायराला आणि तिच्या मित्र मैत्रिणींना ड्रग्स घेताना रंगेहाथ पकडले आहे. तसेच पोलिस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहे.

सांता क्रुज पोलिसांनी दोघांना सोमवारी न्यायालयात नेले होते. त्यानंत दोघांना बेल देण्यात आली आहे. नायराने काही तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण आता या ड्रग्स प्रकरणामुळे तिच्या करीयरवर त्याचा वाईट परीणाम होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

सनी देओलच्या एका हट्टामूळे झाले होते धर्मेंद्रचे करोडोंचे नुकसान
तु अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस; हटके लुकमुळे अभिनेत्री प्रियंका उध्वानी झाली ट्रोल
सोलापूरमध्ये अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, कोरोना रुग्ण २४ तासांत होतोय बरा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.