शिट्ट्या आणि टाळ्यांच्या नादात नागराज आणि किशोर कदम यांचे जंगी स्वागत झाले. कॉलेजच्या प्राचार्या तसेच शिक्षकांनी या दोघेही प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. शुद्ध भाषा असं काही नसते, असे परखड मत नागराज यांनी वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये मुंबई टाइम्स कार्निव्हल २०२३ च्या समारोप प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
‘शुद्ध अशी संकल्पनाच मुळी चुकीची आहे. माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतोय. अमेरिकी भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांच्या शब्दांत सांगायचं तर भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं असतो’, असे स्पष्ट शब्दात नागराज यांनी आपले मत व्यक्त केले.
नागराजची जादू अनुभवायला मिळावी यासाठी संपूर्ण कॉलेजचा परिसर ‘कार्निव्हल’मय झाला होता. शिट्ट्या आणि टाळ्यांच्या नादात नागराज आणि किशोर कदम यांचे जंगी स्वागत झाले. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.शुभदा नायक तसेच इतर शिक्षकवृंद यांच्या वतीने नागराज आणि किशोर कदम यांचे स्वागत करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर नागराज आणि कदम हे मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या सभागृहात गेले. तुझं दिसणं, जगणं यावर कशी मात केली? असा प्रश्न विचारला असता, यावर नागराज यांनी उत्तर दिले की,’ मलाही माझ्या दिसण्याचा खुप न्यूनगंड होता. पण आता नाही आहे’.
‘सौंदर्य ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सौंदर्याची व्याख्या खरं तर मला आता कुठे कळायला लागली. गोरेपणा म्हणजे सौंदर्य नव्हे. साधी-साधी दिसणारी माणसंही मला सुंदर वाटतात. काहीच काम न करणाऱ्या हातांपेक्षा राबणारे हात मला सुंदर वाटतात’. ‘सैराट म्हटला तर माझ्या जीवनाशी संबंधित आहे आणि म्हटला तर नाही. पण ते महत्त्वाचं नसून तो आपल्या वास्तवाशी संबंधित आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे’, असंही नागराज यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
कवी आणि अभिनेते किशोर कदम यांच्या प्रश्नांना नागराज यांनी दिलखुलासपणे दिलेल्या उत्तरांनी जमलेल्या विद्यार्थ्यांचे मनं जिंकली. वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल २०२३ ’चा समारोप झाला.
महत्वाच्या बातम्या
Nagraj manjule : पुन्हा एकदा जमली आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांची हिट जोडी, घेऊन येत आहेत ‘हा’ नवा चित्रपट
nagraj manjule : मराठी माणसाच्या ‘या’ स्वभावामुळेच मराठी चित्रपट चालत नाही; नागराज मंजुळेंचे रोखठोक वक्तव्य
‘फुटपाथवरली दहाबारा पोरं हे कॉम्बिनेशन नागराजने ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’नंतर.., किशोर कदमने व्यक्त केल्या भावना