नागपुरमध्ये मित्राने केली फिल्मी स्टाईलमध्ये तरुणाची हत्या; हत्येचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल

सध्या नागपुरमधला एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहेय या व्हिडिओमध्ये नागपुरच्या नागनदीमध्ये एका युवकी फिल्मी स्टाईलने हत्या करण्यात आली आहे. हत्या करुन हे आरोपी फरार झाले आहे.

नागपुरच्या नागनदीमध्ये २२ तारखेला योगेश नामक तरुणाची हत्या करण्यात आली. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी या हत्येचा व्हिडिओ काढला आहे. हत्या केल्यानंतर ते आरोपी तिथून पसार झाले आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर परीसरात या तरुणाची दोन तीन तरुणांनी मिळून हत्या केली आहे. मृत तरुणाचे नाव योगेश धोंडगे असून त्याचे वय ३० आहे. अनैतिक संबंधातून योगेशची हत्या करण्यात आली होती, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

आरोपीचे नाव गोलू धोटे असे आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास योगेश त्याच्या घरी आला होता. त्याचवेळी गोलू आणि त्याच्या काही साथीदारांना घेऊन योगेशच्या घरात शिरला आणि योगेशला मारहाण करण्यास सुरुवात केली.

योगेशला वाचवण्यासाठी त्याची आई आणि पत्नी धावून आली. त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, पण वाद सुटत नव्हता. त्यानंतर योगेश घराबाहेर पळाला. गोलूने त्याला पकडून तिथेच त्याच्यावर चाकू हल्ला केला आणि सोडून दिले.

जखमी अवस्थेत योगेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मृतक योगेशच्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते.

या संबंधांबद्दल गोलूला कळले. विशेष म्हणजे गोलू आणि योगेश हे दोघे पण चांगले मित्र होते. पण एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे गोलू आणि योगेशमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होता. माभ च वादातून आता योगेशची हत्या झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाबो! भंगारवाल्याने चक्क खरेदी केले 3 हेलिकॉप्टर, तब्बल एवढी चुकवली किंमत
धक्कादायक! पत्नीने भरपंचायतमध्ये पतीला मारली गोळी; कारण वाचून बसेल धक्का
अभिनेता कार्तिक आर्यन १० दिवसांत झाला कोट्यधीश, जाणून घ्या कशी लागली लॉटरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.