Share

Nagpur Hit And Run : धक्कादायक! लग्न समारंभ उरकून घरी येताना काळाने घेरलं, सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी अंत

Nagpur Hit And Run: उपराजधानीत पुन्हा एकदा हिट अँड रनचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. संविधान चौक (Samvidhan Chowk) परिसरातून रात्री मोटारसायकलवरून घरी परतणाऱ्या कुटुंबावर भरधाव ट्रकने अशी जोरदार धडक दिली की रुद्र सुनील सिंगलधुपे (Rudra Sunil Singaldhupe) आणि त्याची बहिण सिमरन सुनील सिंगलधुपे (Simran Sunil Singaldhupe) यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. आनंदात गेलेला लग्नसोहळ्याचा दिवस काही क्षणांत शोकांतिकेत बदलला. अपघातात शेषनाथसिंग जागेश्वरसिंग (Sheshnathsingh Jageshwarsingh) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही तिघं कामठी (Kamptee) येथील नातेवाईकांच्या लग्नाला जाऊन परतत होती. मोटारसायकल संविधान चौकात पोहोचताच मागून भरधाव ट्रक येऊन त्यांना चिरडलं. धडकेचा आवाज, पडलेली लेकरं आणि गोंधळ पाहून क्षणभर परिसर थिजून गेला. त्यात रुद्रचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सिमरनला मेयोमध्ये नेल्यानंतरही डॉक्टरांना तिचे प्राण वाचवता आले नाहीत. ट्रकचालक मात्र अपघातानंतर पसार झाला, परंतु पोलिसांनी शोध घेऊन आरोपी चालकाला अटक केली.

लग्नाला हट्ट करून गेले आणि…

शेषनाथसिंग यांचा दुधाचा व्यवसाय असून घराचे बांधकाम सुरू आहे. लग्नाला जायचा हट्ट रुद्र आणि सिमरनने धरला होता. रात्री १०.३० च्या सुमारास ते तिघे एमएच-३१-एफके-१८११ या मोटारसायकलने नागपूरकडे परतत होते. तेवढ्यात एनएल-०१-एजी-०८६८ या ट्रकने मागून धडक देत सर्वांचे भवितव्य उद्ध्वस्त केले.

याच रात्री दुसरीही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मिथुन दुर्योधन मेते, पश्चिम बंगाल येथून आलेला मजूर, मेट्रोच्या कामावरून पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला चिरडून ठार केले. चालक अंधाराचा फायदा घेत वाहनासह फरार झाला. जुनी कामठी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now