पुनर्विवाहानंतरही विधवेला पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

विधवा महिलेला आपल्या समाजात कमी लेखलं जात. मात्र सध्याची न्यायव्यवस्थेच्या स्थापनेमुळे स्त्रियांना समाजात स्थान मिळाले आहे हे नक्की. खरंतर पतीच्या मृत्यूनंतर पत्नी हीच पतीची वारस असते, मात्र काय होते जेव्हा पत्नी ही पतीच्या निधनानंतर दुसरा विवाह करते? दुसरा विवाह केल्यानंतही तिचा पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार राहतो? अशीच एक घटना समोर आलीय ती म्हणजे नागपूर येथून.

एका विधवा महिलेने नवऱ्याच्या मृत्यूनंतर एका महिन्यातच पुनर्विवाह केला या महिलेचा पती रेल्वेमध्ये पॉइंट्समन म्हणुन कार्यरत होता. रेल्वेकडून मृत व्यक्तीच्या पत्नीला लाभ देण्यात आला. मृत व्यक्तीच्या पत्नीने दुसरा विवाह केल्याने तिला संपत्तीमध्ये अधिकार देण्यात येऊ नये म्हणून मृताच्या आईने कोर्टात धाव घेतली.

यानंतर नागपूर न्यायालयाने त्या संपत्तीवर दोघांचाही सामान हक्क असल्याचं मत दिले आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा वारस म्हणून पती/ पत्नीकडे पाहिले जाते. म्हणूनच रेल्वेने वारस म्हणून पत्नीच्या खात्यात ६५ हजार रुपये जमा केले होते.

आपल्या मुलाचे निधन झाल्यावर सुनेने दुसरा विवाह केल्यानंतर आपल्या मुलाचे वारस आपण असून त्याची संपत्ती अजून दुसऱ्या कोणाला मिळू नये म्हणून मृताच्या आईने न्यायालयाचे दरवाजे ठोकले. न्यायालयात दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. दोघांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने या संपत्तीवर आई आणि विधवा पत्नी यांचा समान हक्क असल्याचा निर्णय दिला आहे.

सर्वात आधी मृताच्या आईने दिवाणी न्यायालयात धाव घेत. मुलाच्या संपत्तीवर आपला अधिकार असल्याचा दावा केला होता, दिवाणी न्यायालयाने आईच्या बाजूने निकाल देत असल्यामुळे विधवा पत्नीचा हक्क अमान्य केला होता. विधवा पत्नीने जिल्हा न्यायालयात धाव घेत दिवाणी न्यायालयाच्या निकालाला आवाहन दिले. जिल्हा न्यायालयाने यंदा दिवाणी न्यायालयाचा निकाल बदलवत आई आणि विधवा पत्नी दोघांचाही संपत्तीवर समान अधिकार असल्याचा निर्णय दिला.

जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, विरोधात मृत व्यक्तीच्या आईने पुन्हा उच्च न्यायालयामध्ये अपील केले. आई आणि पत्नी दोघेही प्रथम वारसदारामध्ये येत असल्याचे न्यायालायने स्पष्ट केले. विधवा पत्नीचा पुर्नविवाह झाला तरी तिचा पतीच्या संपत्तीवर अधिकार आहे असं सांगत आई सुद्धा प्रथम वारसदारामध्ये मोडत असल्याने अर्धी रक्कम आईला देण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला.

 

महत्वाच्या बातम्या
“नाव वाघ असलं म्हणून मांजर वाघ होत नाही अन् अशा ५६ चित्रा वाघ आल्या तरी मी त्यांना घाबरत नाही”
हैद्राबाद बलात्कार प्रकरण; सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांना अटक होण्याची शक्यता..
‘बसपन का प्यार’ सहदेवचं नवीन गाणं व्हायरल, आता नवीन गाणं देखील सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ
मांजरीची शिकार करायला गेलेल्या बिबट्याला मांजरीने घडवली अशा प्रकारे अद्दल की…. पाहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.