पुणे ते नागपूर भाजप भूईसपाट! विधान परिषदेत महाविकासआघाडीचा डंका

मुंबई | गेल्या ३० वर्षांपासून पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व होते. मात्र राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे. पुणे पदवीधर हा भाजपचा हक्काचा असणारा मतदारसंघ या निवडणुकीत त्यांच्या हातून निसटला आहे.

तर नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. यामुळे यंदा विधान परीषदेत महाविकासआघाडीचा डंका असणार आहे.

हिंमत असेल तर…
पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे.

पुढे ते म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खच्चीकरण झालं असून राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार…
पुणे पदवीधर मतदारसंघात गेल्या ३० वर्षांत भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. २००२ ला जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांचा अपवाद वगळता २४ वर्षे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिनिधित्व केले. तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. तर यंदा राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
विधानपरिषदेतील दारूण पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात; हिंमत असेल तर…
रेखा जरे ह.त्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; ज्येष्ठ पत्रकारानेच दिली सुपारी!
भाजपची झाली नाचक्की; भाजपचे आयटी सेल प्रमुखांचे ट्विट फेक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.