नागपूरच्या दीक्षाभूमीत उभे केले ३० बेड्सचे कोविड सेंटर; गरीब रुग्णांना मिळणार मोफत उपचार

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे ठीक ठिकाणी कोविड सेंटरची उभारणी पण केली जात आहे. कोविड सेंटरची उभारणी होत असल्यामुळे रुग्णांची पण सोया होत आहे.

नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमी येथे पण कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आल आहे. कोरोनाच्या वाढत्या काळात दिनांक ९ मे पासून सुरु होणारे कोविड सेंटर सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरणार आहे.

नागपूर मधील दीक्षाभूमी येथील या कोविड सेंटरचे उदघाटन भन्ते सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. नागपुरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी हे कोविड सेंटर उघडण्यात आले आहे.

या कोविड सेंटरच्या उभारणीसाठी दीक्षाभूमी स्मारक समिती पुढे आली आहे. दीक्षाभूमी कोविड सेंटरच्या वतीने ३० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. हे कोविड सेंटर दीक्षाभूमी परिसरातील यात्री निवास मध्ये उघडण्यात आले आहे.

३० बेड्सच्या असणाऱ्या या कोविड सेंटरमध्ये १५ साधे बेड आणि १५ ऑक्सिजनचे बेड बसवण्यात आलेले आहेत. येथील ऑक्सिजन बेड्ससाठी कायमस्वरूपी केंद्रीय ऑक्सिजन प्रणाली बसवण्यात आली आहे.

येथील कोविड सेंटर पूर्णपणे मोफत असून त्याचा खर्च स्मारक समितीतर्फे केला जाणार आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४ एमडी डॉक्टर आणि ३ नर्सेस या कोविड सेंटरमध्ये २४ तास उपलब्ध राहणार आहेत. विना लक्षणे व सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर येथे उपचार केले जाणार आहेत.

ताज्या बातम्या
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री का करत नाही मेकअप? कारण जाणून घ्या 
करीना कपूरने विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला म्हातारी म्हणून हिणवले; वाचा पूर्ण किस्सा
IPL मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूच्या वडीलांचे कोरोनाने निधन; ‘ते’ स्वप्न राहीले अधुरे

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.