विवाहीत अभिनेता रवी किशनच्या प्रेमात पडली होती नगमा; रवीच्या पत्नीला समजल्यावर मात्र…

रवी किशनने फक्त हिंदी नाही तर अनेक भाषांच्या चित्रपटामध्ये काम केले आहे. सगळीकडेचं त्यांच्या अभिनयाची खुप जास्त प्रशंसा केली जाते. अभिनयासोबतच रवी किशन यांनी राजकारणात देखील चांगले नाव कमवले आहे.

रवी किशन यांचा बॉलीवूड ते भोजपुरी सिनेमा आणि भोजपुरी सिनेमा ते राजकारण हा प्रवास सोपा नव्हता. १९९० साली रवी किशन फक्त ५०० रुपये घेऊन जोधपूरवरून अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ५०० रुपये आणि त्यांचा अभिनय या दोनच गोष्टी होत्या.

पण त्यांनी कधीही हार मानली नाही. अनेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहनत करत राहिले. ‘तेरे नाम’ चित्रपटापासून त्यांना बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली. पण काम मिळत नव्हते. हळूहळू त्यांना यश मिळत गेले. आज ते भोजपुरीचे स्टार आहेत.

बिहार युपीमध्ये त्यांचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत भोजपुरीमध्ये काम केले आहे. बॉलीवूड अभिनेत्री नगमाने देखील त्यांच्यासोबत भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले होते. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले.

त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला. सलमान खानसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यु करणारी नगमा भोजपुरीमध्ये देखील चांगलीच प्रसिद्ध आहे. बॉलीवूडमध्ये यश न मिळाल्यामूळे तिने दुसरीकडे काम करायला सुरुवात केली.

भोजपुरीमध्ये नगमाला चांगले यश मिळू लागले. तिने रवी किशनसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. एकत्र काम करता करता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सुरुवातीला त्यांनी या नात्याचा स्वीकार केला नाही. पण थोड्या दिवसांनी मात्र त्यांनी या नात्याचा स्वीकार केला.

ज्या वेळी रवी किशन नगमाला भेटले त्यावेळी ते विवाहीत होते. १९९६ मध्ये त्यांनी प्रीती किशनसोबत लग्न केले होते. ज्यावेळी त्यांच्या पत्नीला त्यांच्या नगमासोबतच्या नात्याबद्दल समजले त्यावेळी त्या चिडल्या. त्यांनी दोघांच्या नात्याचा स्वीकार केला नाही.

पण काही दिवसांनी रवी किशनची पत्नी आणि नगमामध्ये चांगली मैत्री झाली. रवीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘नगमा अनेकदा त्यांच्या घरी यायची आणि त्यांच्या पत्नीसोबत मिळून जेवण बनवायची’. सगळं काही सुरळीत सुरू होते.

काही दिवसांनी मात्र दोघांच्या नात्यात मोठी दरार आली. रवीने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला तेव्हा त्यांच्या नात्याचा अंत झाला. नगमाने चित्रपटांपासून दुर गेली. आज ती राजकारणात सक्रिय आहे. तर रवी किशन अनेक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

हेमामालिनीसोबत किसिंग सीन करणार होते फिरोज खान; पण ‘या’ व्यक्तीने केला कडाडून विरोध
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; पहा लग्नाचे फोटो
‘लव्ह स्टोरी’ फेम अभिनेत्री विजेता पंडितची झाली आहे खुपच वाईट अवस्था; आर्थिक अडचणींचा करत आहे सामना
शिल्पा शेट्टीला जबरदस्ती किस केल्यामुळे अडचणीत आला होता अभिनेता; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.