नागिणीने घेतला नागाच्या हत्येचा बदला,नागाची हत्या करणाऱ्याला तिने शोधलं आणि..

अहमदाबाद। आपण लहानपणापासून सापांविषयी अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. आधीपासूनच आपण ऐकत आलो आहे की, जर सापांची कोणत्याही व्यक्तीने कळ काढली तर साप पाठलाग करत त्याच्या घरी येतो व आपला बदला घेतो. जरी कोणाचा चुकून पाय किंवा सावली सापावर पडली तरी साप त्या व्यक्तीची पाठलाग करून त्याला डसतो.

मात्र हे आपण ऐकलंय त्याच्यावर आधारित मालिका किंवा अनेक चित्रपटही आपण पाहिले आहेत. मात्र अशा गोष्टी २१ व्या शतकात क्वचित पाहायला किंवा ऐकायला मिळतात. त्यातही ग्रामीण भागात सापांच्या जाती आढळतात. त्यामुळे अशा घटना ऐकायलाच चांगल्या वाटतात.

पण गुजरातमध्ये घरात साप आढळल्याने तीन दिवसात घरातील दोन सदस्यांचा साप चावून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गुजरातमधील गांधीनगर येथील आहे. एका घरात साप आढळल्याने कुटुंबातील व्यक्तींनी त्याला मारले.

मात्र तीन दिवसात त्या घरातील ७ वर्षाच्या मुलीला व एका महिलेचा साप चावून मृत्यू झाला आहे. या दोघींचं काकू व भाची असं नातं होत. सकाळीच्या सुमारास घराच्या कडेला लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या पायाच्या मांडीवर साप चावला.

सोबतच ७ वर्षाची मुलगी घरच्या बाहेर खेळत होती, तिला पण साप चावला. या दोघीनाही लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं, मात्र विषारी साप चावल्याने त्यांच्या अंगात खूप जलद गतीने विषाचा फैलाव झाला. व शेवटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर उपचारादरम्यान डॉक्टरने मृत झाल्याचे घोषित केले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघीना पण एकाच ठिकाणी साप डसला आहे. मात्र या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. नागच्या मृत्यूचा सूड घेणारी नागीण ही संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या
मोठा खुलासा! खासदार-अभिनेत्री नुसरत जहाँचे लग्नापूर्वी होते ‘या’ आरोपीसोबत प्रेमसंबंध
लग्नाच्या अगोदर ऋषी कपूरच्या लव्ह गुरु होत्या नीतू सिंग; अनेकदा त्यांच्या गर्लफ्रेंडसोबतचे भांडण सोडवले
याला म्हणत्यात जुगाड! धर्मेद्रच्या स्विमिंग पुलवरून प्रेरीत मुलांनी चालत्या ट्रॅक्टरमध्येच बनवला स्विमिंगपूल
पीडित महिलेला अजित दादांनी ऑन द स्पॉट मिळवून दिला न्याय, पोलिस पतीसह कुटुंबावर दाखल केला गुन्हा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.