नागीण, नागवेढावर शंभर टक्के प्रभावी आणि आयुर्वेदिक औषध, वाचा सविस्तर…

नागीण किंवा नागवेढा हे नाव ऐकले तरी थरकाप होतो. हा एक त्वचारोग आहे. या आजाराविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत. यामध्ये अंगाला नागीणीने विळखा मारल्यास माणसाचा मृत्यू होतो असे म्हटले जाते. हा एक गैरसमज आहे. पण आज तुम्हाला आजीबाईच्या बटव्यातील काही लाभदायक उपाय सांगणार आहे. यामुळे तुम्हाला या आजारापासून आराम मिळेल.

पावसाळा आणि उन्हाळा या ऋतूत विषाणू जास्त पसरतो किंवा सक्रिय असतो. लहानपणी ज्या व्यक्तींना कांजण्या होतात, त्या रुग्णांमध्ये हे विषाणू मज्जारज्जूमध्ये सूप्त रुपात कायम वास्तव्य करतात. आपली प्रतिकारशक्ती काही करणाने कमी झाल्यास सूप्त विषाणू जागृत होतात. कांजण्याच्या विषाणूंमुळे होणारा नागीण हा संसर्गजन्य आजार आहे.

नागीण या आजारावर लाभदायक उपाय आहेत. हे तुम्ही घरगूती पद्धतीने करु शकता. यामुळे तुमच्या आयुष्यातील काही समस्या असतील त्या नष्ट होण्यास मदत होईल.

एखाद्या मनुष्याला नागीण होते तेव्हा त्याच्या अंगावर बारीक बारीक पुळ्या येतात. यानंतर या पुळ्यांचा संपुर्ण शरीरावर गोलाकार वेढा येतो. त्यालाच हा नागीणीचा विळखा पडतो असे म्हणतात. यावर उपाय म्हणून तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यायला हवे. त्याचबरोबर तुम्ही घरगुती उपायही करु शकाता.

नागीणमुळे तुमच्या शरीराचा दाह होतो. त्या भागात जळजळ होते. तेव्हा थंड पाण्याच्या पट्ट्या करुन पुरल किंवा पुळ्या आलेल्या ठिकाणी ठेवा. नंतर मखमली प्रकारचा कपडा टॉवेल घेऊन तो भाग हळूवार कोरडा करा. जोरात घसल्यास पुळ्या फुटू शकतील. त्यासाठी काळजी घ्या अन्यथा त्यातून तुम्हाला जळजळ होईल.

या त्वचारोगावर उपाय म्हणून तुम्ही लाजाळू च्या पानांचा रस सुद्धा वापरु शकता. त्यासाठी लाजाळूच्या पानांचा रस आणि तांदूळ धुतलेले पाणी एकत्र करुन नागीण झालेल्या भागावर लावा. तसेच तुम्ही चंदनाची पेस्ट सुद्धा प्रभावीत जागावेर लावू शकता. तसेच कडू लिंबाचा पाला पाण्यात उकळवून त्या पाण्याने आंघोळ करु शकता.

नागीण हा आजार अगदी १००% बरा होऊ शकतो. पण आजार बरा होण्यासाठी प्रत्येकाचा कालावधी हा वेगवेगळा असतो. साधारण एक वर्षभर काळजी घेणे गरजेचे असते. नागीण झाल्याचे लक्षात आल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ल्याने औषधोपचार करावे. तज्ज्ञांनी दिलेला गोळ्या-औषधांचा डोस आणि कोर्स पूर्ण करा.

महत्वाच्या बातम्या-
खाजवत बसु नका! ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा खाज, खरूज, गजकर्णपासून सुटका
गॅस, अपचन, उलटी, ऍसिडिटीवर सर्वात सोप्पा घरगुती व रामबाण उपाय; क्षणात मिळेल पोटाला आराम
तुम्हालाही प्रवासात उलटी होते का? काळजी करू नका ‘हे’ घरगुती उपाय करा आणि प्रवासाचा आनंद घ्या
माशाचा काटा घशात अडकल्यास घाबरू नका; ‘हा’ उपाय करा व काही मिनिटांतच मिळवा आराम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.