१४ व्या वर्षी आईबापाने लावले लग्न, १८ वर्षी मुले; पण आज आहे महाराष्ट्राच्या लेडी सिंघम.. नाव ऐकून अंगावर काटा येईल

आयुष्यात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जी पुढ जाण्यासाठी प्रेरणा देतात. तर अशीही माणसे असतात ज्यांचा आदर्श ठेवून आपण आयुष्याची वाटचाल करत असतो. आपले आई-वडील नेहमीच प्रेरणास्थानी असतात तर उच्च शिक्षित आदर्शस्थानी.

आज आपण अश्याच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी गुडघे टेकविण्यापेक्षा संकटांचा न डगमगता सामना करायला हवा ही शिकवण दिली आणि त्या आता आयपीएस बनल्या. आयपीएस अंबिका यांना लोक मुंबईची लेडी सिंघम म्हणून ओळखतात.

एन. अंबिका यांचा जन्म तामिळनाडूच्या खेड्यातील. दहावीत असताना शाळेतील एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या तहसीलदारांच्या भाषणाने त्या प्रभावित झाल्या. आणि समाजासाठी काहीतरी करायचे अस मनी ठरवल.

परंतु, अंबिकाचे लग्न तिच्या पालकांनी १४ वर्षांचे असताना केले होते. त्यावेळी अंबिकाचा नवरा पोलिस कॉन्स्टेबल होता. प्रजासत्ताक दिनी एक दिवस अंबिका तिच्या नवऱ्याबरोबर पोलिसांची परेड पाहण्यासाठी गेली होती.

तिथे तिने पाहिले की तिचा नवरा उच्चपदस्थ अधिका-यांना सलाम करीत आहे. अंबिकाला हे समजले नाही. तिने पतीला विचारले की ते कोण आहेत आणि तुम्ही असे का केले? नवऱ्याने सर्व काही समजून सांगितल्यावर आपणही असेच काहीतरी बनायचे असे तिने मनात ठाम ठरवल. आणि त्या दिशेने वाटचाल करू लागली.

संसार सांभाळतानाच स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पतीनेही पाठिंबा दिला. दरम्यान, मुलगा झाला. तरीही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. पहिल्यांदा अपयश आले.

पुन्हा तयारी सुरू केली. परंतु, अपयश पाठ सोडेना! त्यादेखील जिद्दी होत्या. त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. दरम्यान दुसरा मुलगा झाला. संसार, लहानग्यांचे संगोपन आणि स्पर्धा परीक्षा… अशी तारेवरची कसरत सुरूच होती. अखेर मेहनतीला यश आले. पाचव्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या.

लेडी सिंघम की कहानी: बाल विवाह हुआ, 18 साल में बनी मां, फिर जी-तोड़ मेहनत की और IPS बन गईं

अंबिका यांचा प्रवास सोप्पा नव्हता. एका खासगी कोचिंग क्लासमधून आणि नंतर डिस्टंस लर्निंगद्वारे पदवी पूर्ण केली. एवढे सगळे तिने घर, संसार सांभाळून केले तेव्हा कुठे ती आयपीएस बनण्यास पात्र ठरली.

डिंडीगुलमध्ये आयपीएस परिक्षेसाठी कोणतेही कोचिंग सेंटर नव्हते. त्यामुळे अंबिकाने चेन्नईमध्ये राहून सिव्हिल सर्व्हिस परिक्षेची तयारी करण्याचे ठरविले. पतीनेही तिला साथ दिली. जेव्हा अंबिका चेन्नईला राहत होत्या तेव्हा त्यांचे पती नोकरी करत मुलांनाही सांभाळत होते.

अंबिका आयपीएसची परिक्षा एकदा नाही तर तिनदा नापास झाल्या. मात्र, त्या हार मानणाऱ्यातील नव्हत्या. एक वेळीस तिच्या पतीला वाटत होते की आता तिने माघारी यावे. मात्र, अंबिका यांनी शेवटचा चान्स घेण्याचे ठरवले आणि २००८ मध्ये त्या पासही झाल्या. आयपीएस अधिकाऱ्याचे ट्रेनिंग पूर्ण केल्यावर त्यांना पहिली पोस्टिंग महाराष्ट्रात मिळाली.

14 साल की उम्र में हुई शादी, अंबिका ऐसे बनी IPS, अब हैं मुंबई की लेडी सिंघम | NewsTrack

२००९ मध्ये त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या. त्यावेळी मोठा मुलगा पाच वर्षाचा तर लहानगा एक वर्षाचा होता. अकोला, हिंगोली, नाशिकमध्ये कर्तव्य बाजावल्यानंतर आज अंबिका या मुंबईच्या झोन-४ च्या डीसीपी आहेत. रुजू झाल्यापासून त्या आपली जबाबदारी चोख पार पडतात.

शहरात मोठे गणेशोत्सव पार पडतात. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. गर्दीत चोरी, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक आघाड्यांवर वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या साथीने अंबिका यांनी चोख बंदोबस्त ठेवला. एके काळी सोनसाखळी चोरीच्या घटना फार घडायच्या. अंबिका यांनी अचूक व्यूहरचना आखली. गस्त, बंदोबस्ताची पद्धत बदलली.

आरोपी लवकर पकडले जावेत, चोरी मुद्देमाल ज्याचा त्याला परत मिळावा, यासाठी धडपड सुरू असते असे अंबिका यांनी सांगितले. महिला घराचीच नव्हे, तर देशाच्या संरक्षणाची जबाबदारीही सक्षमपणे पेलू शकतात हे अंबिका यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

हे ही वाचा-

सोलापूरमध्ये अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, कोरोना रुग्ण २४ तासांत होतोय बरा

इंडिअन आयडल १२: सोनू कक्कडला शोची जज म्हणून पाहताच लोक भडकले, म्हणाले संपूर्ण कार्यक्रमातच गडबड

भारीच! भाभीजीने हरयाणवी गाण्यावर साडी घालून केला डान्स; लाखो लोकं झाले डान्सचे फॅन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.