भारताशेजारच्या या देशात पुन्हा एकदा लष्करशाही; राष्ट्राध्यक्षाला लष्कराने केली अटक

नवी दिल्ली | भारताचा शेजारी असलेला देश म्यानमारमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. यामुळे लष्कराने उठाव करत सत्ता काबीज केली आहे. लष्कराने बंड करत सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या नेत्या आणि स्टेट काउंसलर आँग सान सू ची यांना अटक केली आहे.

दरम्यान, सू ची यांना अटक केल्यानंतर काही तासांतच लष्कराने बंड केल्याचे टीव्हीवर जाहीर करण्यात आले. तसेच त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षालाही ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु याबद्दल आतापर्यंत संपुर्ण महिती मिळू शकलेली नाही.

या सत्तासंघर्षामुळे म्यानमारमध्ये सर्व दळवळण व्यवस्था ठप्प बंद करण्यात आली आहे. तसेच सर्व दूरसंचार प्रणाली बंद करण्यात आली आहे. नॅशनल लीग ऑफ डेमोक्रेसी पार्टीच्या सदस्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच लष्करी सैनिकांनी विविध प्रांतातील मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतले आहे.

यापुर्वी ५० वर्षे देशात सैन्याचे शासन होते. २०११ मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या निवडणूकीत नॅशनल लीग डेमोक्रसी पक्षाने ८३ टक्के जागा जिंकल्या. लष्करी शासन संपुष्टात आल्यानंतर या दुसऱ्याच निवडणूका झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
वडीलांनी दिलेला ‘तो’ सल्ला मी आजही लक्षात ठेवलाय; खिलाडी अक्षयकुमारने दिली कबुली
कंगणाचा पुन्हा कांगावा! नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ ट्विट करत म्हणाली….
तुकाराम मुंढेंचा कोरोना काळात भाजपच्या नेत्यांसोबत राडा होऊनही गडकरींनी केले मुंढेंचे कौतुक
“ममता दिदींनी पश्चिम बंगालला प्रत्येक क्षेत्रात मागे नेले, जनता त्यांना कधीही माफ करणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.