माझ्या बायकोचे माझ्या भावोजीसोबत अफेअर होते; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे खळबळजनक आरोप

मुंबई। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. राज यांचे हे दुसरे लग्न आहे. जेव्हा त्यांच्यात आणि शिल्पा यांच्यात जवळीक वाढली होती, तेव्हा दोघांनीही लग्न केले.

त्यावेळी राज कुंद्राची पहिली पत्नी कविता हिने राज आणि तिचे लग्न मोडण्यामागे शिल्पा कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. कविताने एका मुलाखतीत त्या दोघांच्या घटस्फोटामागे अनेक कारणं सांगितली होती. ती म्हणाली होती की,”तिनं माझ्या संसारात आग लावली.

राज एक विवाहित पुरुष आहे हे माहित असताना देखील तिनं त्याच्यासोबत जवळीक वाढवली. तिच्यामुळंच आमचा हसता-खेळता संसार मोडला” असा आरोप तिनं केला.

दरम्यान, एका मुलाखतीत राजने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या घटस्फोटाचं कारण देखील त्याने सांगितलं आहे. “आम्ही सगळे माझ्या आई-वडिलांसोबत एकाच घरात राहत होतो.

आमच्या सोबत माझी बहीण आणि मेहूणादेखील राहत होते. कारण इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा ते प्रयत्न करतं होते. ती माझ्या त्या मेहूण्यासोबत अधिक वेळ व्यथित करू लागली होती. विशेषतः जेव्हा मी बिजनेस ट्रिपसाठी बाहेर जायचो तेव्हा. माझ्या कुटुंबातील अनेकांनी एवढंच नाही तर माझ्या ड्रायव्हरने देखील त्या दोघांमध्ये काही तरी सुरु आहे असे मला सांगितले.

मात्र, मी यावर कधीच विश्वास ठेवला नाही, मी माझ्या पत्नीवर कधीच संशय केला नाही,” असं राज म्हणाला. माझ्या पत्नीचे आणि बहिणीच्या पतीचे संबंध होते. या बाबत माझ्याकडे पुरावे देखील होते परंतु दोघांनी कायमच नकार दिला.

या प्रकरणाला वैतागून अखेर मी कविताला घटस्फोट दिला. या प्रकरणाशी शिल्पाचा काहीही संबंध नाही. ती उगाचच प्रसिद्धीसाठी तिला यामध्ये खेचत आहे. इतके दिवस मी शांत होतो कारण याबाबत मी काहीही बोलू नये अशी शिल्पाची इच्छा होती.

माझं कुटुंबच माझी पहिली प्रायोरिटी आहे त्यामुळं मी शांत राहणं पसंत केलं होतं. पण आता ती माझ्या कुटुंबातील सदस्यांवर खोटे आरोप करत आहे. असे राजने खणखणीत प्रतिउत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या
लातूरमधील धक्कादायक घटना! वांग्याची भाजी न दिल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला रॉकेलने जाळलं
पेट्रोल १०५ रुपयांवर! सामान्य नागरिकांना झटका, १२ दिवसात २ रुपयांनी महागले इंधन
VIDEO, काय म्हणावं या पोराला! मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड
‘या’ शहरात मिळत आहेत फक्त 12 रुपयांमध्ये घर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.