Share

‘माझा मामा ‘या’ ठिकाणी लपून बसला आहे’, दाऊदच्या भाच्याने ईडीसमोर केला मोठा खुलासा

संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेल्या दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम  याचं वास्तव्य कुठे आहे याचा खुलासा करण्यात आला आहे. दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरनं याबाबतचा खुलासा केला आहे. दाऊद पाकिस्तानातील कराची येथे आहे आणि तो जन्माला  येण्यापूर्वीच १९८६ नंतर भारत सोडून गेला होता असे,अलीशाह पारकरने सांगितले आहे.

आलीशाह पारकरने म्हटलं आहे की, भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराचीमध्ये आहे आणि त्याचे कुटुंब सणासुदीच्या वेळी दाऊदच्या पत्नीच्या संपर्कात असते. अंमलबजावणी संचालनालयाला अंडरवर्ल्ड डॉनचा भाचा अलीशाह पारकरने याबाबत जबाब दिला आहे.

अलीशाह पारकरने जबाबात सांगितले आहे की, दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे आणि तो १९८६ पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथे असल्याचे मी विविध स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे. अलीशाहनला सांगायचे आहे की, दाऊद इब्राहिम माझे मामा कराची, पाकिस्तान येथे आहेत.

भारत सोडला तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता आणि मी किंवा माझे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात नाही. मला हे देखील नमूद करावेसे वाटते की कधीकधी ईद, दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने माझे मामा दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन दाऊद इब्राहिम माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतात, असंही अलीशाहनं सांगितलं आहे.

दाऊद हा संयुक्त राष्ट्राने घोषित  केलेला दहशतवादी आहे. अनेक वर्षापासून दाऊद सुरक्षा यंत्रनेच्या रडारवर आहे. याचं वास्तव्य कुठे आहे याचा खुलासा झालेला आहे. दाऊदचा ठावठिकाणा समजल्याने सुरक्षा यंत्रणा काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वांचे आहे.

अलीशाह पारकरची अंमलबजावणी संचालनालयाने अनेकदा चौकशी केली आहे. फेब्रुवारीमध्ये याआधी दाऊद इब्राहिमच्या भाच्याची मुंबईतील एका राजकारण्याशी संबंध असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली होती.

महत्वांच्या बातम्या:-
४ करोडचं घड्याळ ते चार्टड प्लेन, Jr NTR ची संपत्तीचा आकडा वाचला तर बॉलिवूडकरही पडतील फिके
मोठी बातमी! श्रीलंकेला भारताचा सहारा, पाठवले तब्बल ४० हजार मेट्रिक टन पेट्रोल
विचित्र प्रथा: बाप मुलीला वाढवतो आणि वयात आल्यावर तिच्यासोबतच करतो लग्न, वाचून हादरून जाल

 

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now