‘माझ्या मुलानं मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्स या गोष्टी देखील कराव्या’- शाहरुख खान

मुंबई। बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा कायम चर्चेचा विषय ठरला आहे. शाहरुख खान सोबत त्याचे संपूर्ण कुटुंबदेखील बऱ्याच वेळा चर्चेत येत असतं. शाहरुख खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त, स्पष्टवादी मुद्द्यांवर बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.

मात्र एका मुलाखती दरम्यान शाहरुखला त्याच्या मुलीबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता, की ‘जर तुझ्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने किस केलं तर तू काय करशील?’ तेव्हा शाहरूख खानने उत्तर दिलं की,’माझ्या मुलीला डेट करण्यापूर्वी तो मुलगा हजारवेळा विचार करेल. आणि घाबरेल ही.’मी त्या मुलाचे ओढ कापून टाकेन.’ यानंतर शाहरूख हसू लागला याचा व्हिडिओ देखील सोहळा मीडियावर व्हायरल झाला होता.

मात्र आता याच शाहरुख खानला मुलाबाबत विचारलं असता त्याने खळबळजनक उत्तर दिल आहे जे ऐकून चाहतेच नाही तर सर्वीकडे खळबळ उडाली असून शाहरुख मुलगा व मुलगीमध्ये भेदभाव करत असल्याचे स्पष्ट समोर आलं आहे.

शाहरुखने १९९७ साली सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी आर्यनचा जन्म झाला होता आणि शाहरुखने पत्नी गौरी खानसोबत सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान त्या शोमध्ये शाहरुखला आर्यानबद्दल विचारले असता शाहरुखने धक्कादायक उत्तर दिल होत.

यावेळी आर्यनबद्दल तो म्हणाल की, ‘आर्यन मोठा झाला की त्याने मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्स या गोष्टींचा देखील अनुभव घ्यावा. ज्या गोष्टी मी माझ्या तरुणपणी करु शकलो नाही त्या सर्व गोष्टींचा अनुभव त्याने घ्यावा. आर्यनने एक बॅड बॉय बनायला हवे आणि जर तो गूड बॉयसारखा वागू लगाल तर मी त्याला घरा बाहेर काढेन’ असे शाहरुख हसहत म्हणाला होता.

पुढे तो विनोद करत म्हणाला, ‘माझी एक इच्छा आहे आर्यने अनेक मुलींना त्रास द्वावा. त्या मुलींचे पालक माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे.’ मात्र शाहरुखच्या मुलाच्या विधानावरुन शाहरुख मुलगी आणि मुलात भेदभाव करतो हे यावरुन स्पष्ट झालं आहे.

आर्यन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आर्यनचे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत. आर्यनने आता पदवी पूर्ण केली आहे आणि चाहते त्याच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत. शाहरुखची मुलगी सुहानाला अभिनयात रस आहे पण आर्यनला अभिनय करायचा आहे की दिग्दर्शन करायचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महत्वाच्या बातम्या
उकळत्या पाण्यात ध्यान लावून बसला चिमुकला; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ 
करुणा शर्मा प्रकरण: चालक अरुण मोरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  
धक्कादायक! भाजप नेत्याच्या पत्नीवर माकडांचा हल्ला; हल्ल्यात पत्नीचा दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू 
ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर १० पटीने महागडे झाले हे खेळाडू, या ब्रॅन्ड्सकडून आली मोठी मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.