कंगना राणावत म्हणते, ‘कठीण काळात मला वडिलांनीही मदत केली नाही’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सतत चर्चेत असते. देशात, राज्यात सूरू असलेल्या विषयावर कगंना ट्विटरच्या माध्यमातून मत मांडत असते. शेतकरी आंदोलन, सुशांत सिंह प्रकरण, राजकीय नेत्यांशी वाद या सर्व प्रकरणात तिने बोलून अनेकांशी पंगा घेतला होता.

एखादी घटना घटना घडते आणि कंगना त्यावर आपले मत मांडत नाही असं कधी होतचं नाही. कंगनाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्यात तिने कलाकार होण्यासाठी किती संघर्ष केला आहे, त्याचा उलगडा केला आहे.

कंगणाने म्हटले आहे की, अगदी कमी वयातचं घर सोडलं. हालाखीचं जीवन जगत असताना वडिलांनीही मदत केली नाही. अथक परिश्रम करून मी स्वत: च्या पायावर उभं राहिले. वयाच्या एकवीसाव्या वर्षी मी माझ्या आयुष्यातील खलनायकांना संपवून राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. एक उत्तम अभिनेत्री म्हणून मी माझी ओळख बनवली. वांद्रे सारख्या मोठ्या एरियात माझं स्वत: चं घर होतं. असं तिने म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी कंगणाने माझ्यासारखी चांगली कलाकार या पृथ्वीवर नाही. अशा आशयाचं ट्विट केलं होतं. तिच्या या ट्विटनंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं होत. कंगणाचा लवकरचं ‘थलाइवी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिने जयललिता यांची भूमिका साकारली आहे.

महत्वाच्या बातम्या-
कंगणाची शरणागती; फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याची दिली कबुली
बाबो! मानसी नाईकने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; सोशल मिडीयावर घालतोय तुफान धुमाकूळ
कंगणाचा धक्कादायक खुलासा; शेतकऱ्यांविषयी बोलण्यासाठी रिहानाला ‘या’ कंपनीने दिले १८ कोटी रूपये

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.