घटस्फोटासाठी ६ महीनेसुद्धा वाट पाहण्याची गरज नाही; वाचा उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल

एकमेकांशी पटत नाही आणि भविष्यात पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यताही नाही या कारणावरून हिंदू दाम्पत्यास सहमतीने घटस्फोट घेतात. पण हायकोर्टाने स्पष्ट केले की, जर पती-पत्नीमध्ये विभक्तता झालेली असेल आणि त्यांनी सोबत राहण्याच्या सर्व शक्यता संपलेल्या असतील तर त्यांना नाते वाचवण्यासाठी वेळ देण्याची आवश्यकता नाही.

पंजाब-हरियाणा हायकोर्टने आपल्या एका निर्णयात आपसातील सहमतीच्या आधारावर घटस्फोटाची मागणी करणार्‍या एका दाम्पत्याला सहा महिन्याच्या कायदेशीर प्रतिक्षा कालावधीत सूट दिली.

हायकोर्टाने या दाम्पत्याला सहा महिन्याच्या कालमर्यादेत सूट देत ताबडतोब फॅमिली कोर्टाला त्याच्या घटस्फोटावर निर्णय देण्याचा आदेश दिला. हायकोर्टाने हा आदेश एका दाम्पत्याद्वारे आपसातील सहमतीच्या आधारावर घटस्फोट मागण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना जारी केला.

यासह हायकोर्टाने स्पष्ट केले की, जर पती-पत्नीमध्ये विभक्तता झालेली असेल आणि त्यांनी सोबत राहण्याच्या सर्व शक्यता संपलेल्या असतील तर त्यांना नाते वाचवण्यासाठी वेळ देण्याची आवश्यकता नाही.

खरंतर घटस्फोट घेऊ इच्छिणा-या दाम्पत्याने त्यासाठी न्यायालयात अर्ज करण्याआधी किमान एक वर्ष विभक्त राहणे आवश्यक असते. शिवाय असा अर्ज केला गेला तरी त्यावर लगेच निर्णय न देता, दोन्ही पक्षांचे संबंध पुन्हा जुळू शकतात का हे पाहण्यासाठी, न्यायालय किमान सहा महिने व कमाल दीड वर्ष देत असते.

लस घ्यायची असल्यास सरकारच्या ‘या’ आदेशांचे करावे लागणार पालन; घ्या जाणून 

‘बाळासाहेबांनीच भाजपला गावखेड्यात पोहचवले, भाजपच्या अस्तित्वाचे श्रेय त्यांनाच’

काय म्हणावे आता ह्याला! एक दोन नाही तर इतक्या मुलांना सायकलवर बसवून नेत होता बहाद्दर; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.