Share

Sangli : सांगली कारागृहात नेताना गुंड गजा मारणेसोबत मटण पार्टी; ४ पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, ढाब्यावरच..

Sangli : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली कारागृहात नेताना, गजा मारणे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी थेट ढाब्यावर थांबून जेवणाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकरण पोलिसांच्या संमतीने घडले असून याची माहिती समोर येताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर तातडीने कारवाई करत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषी अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच गजा मारणेला भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या तीन साथीदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गजा मारणेवर काही महिन्यांपूर्वी कोथरुड परिसरात मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयावर हल्ला केल्याच्या प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्याला सांगली कारागृहात हलवण्यात येत असताना, ‘कनसे ढाब्या’वर थांबून त्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मटण भोजनाचा आनंद लुटला.

या वेळी त्याला भेटण्यासाठी दोन फॉर्च्युनर आणि एक थार गाडीतून तीन साथीदार आले होते. त्यांनी पोलीस व्हॅनपर्यंत येऊन थेट त्याला जेवण दिले. या घटनेमुळे पोलीस विभागातील शिस्तीवर आणि कारागृहांतील बंदीवानांच्या हालचालींवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

निलंबित पोलीस अधिकारी व कर्मचारी

या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु यांच्यासह पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्वांवर कारवाई करताना पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं की, “कुठल्याही बंदीवानाला कायद्याबाहेर जाऊन विशेष वागणूक दिली जाणार नाही.”

गजा मारणेच्या तीन प्रमुख साथीदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते – हा गजा मारणेच्या टोळीतील शूटर असून सांगली परिसरात सक्रिय आहे.या तिघांनी ढाब्यावर थांबून गजा मारणेपर्यंत पोहोचत त्याला भोजन पुरवलं. यामुळे त्यांच्यावरही गुन्हेगारी षड्यंत्र, बंदीवानाशी बेकायदेशीर संपर्क, अशा कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस विभागात संताप आणि चौकशी सुरू

या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पोलिस संरक्षणात असा मोकळा वावर मिळतो यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. पोलिस आयुक्तांनी या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची राजकीय आणि सामाजिक स्तरावरही तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

गजा मारणे प्रकरण काय सांगते?

गजा मारणे हे नाव पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील परिचित नाव आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तो अनेक वेळा पोलिसांच्या रडारवर राहिला आहे. मात्र, पोलीसच त्याला सहकार्य करत असल्याचे चित्र या प्रकरणातून उघड झाल्याने गुन्हेगारांना मिळणाऱ्या ‘राजकीय संरक्षणा’वरही चर्चा सुरू झाली आहे. ही घटना म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, यामुळे पुन्हा एकदा पोलिस यंत्रणेच्या शुद्धीकरणाची मागणी जोर धरत आहे.
mutton-party-with-goons-beating-the-goons-while-taking-them-to-sangli-jail

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now