गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडच्या रायपूरमधील बागेश्वर बाबा चांगलेच चर्चेत आहे. बागेश्वर महाराज यांच्यावर अंधविश्वास पसरवत असल्याचे आरोप होत आहे. तसेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. पण रोज ते एका नव्या गोष्टींमुळे चर्चेत येत आहे.
आता पुन्हा एकदा बागेश्वर बाबा चर्चेत आले आहे. त्यांच्या दरबारात एक मुस्लिम महिला आली होती, तिने बाबांनी केलेल्या गोष्टी पाहून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तिने त्या मंचावरुनच हिंदू धर्म स्वीकारण्याची घोषणा केली. त्यामुळे ती महिला सुद्धा चर्चेत आली आहे.
संबंधित महिला ही छत्तीसगडमधील बिलासपूर येथील रहिवासी आहे. सनातन धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचे महिलेने सांगितले आहे. हिंदू धर्मामध्ये भाऊ-बहिणीचे लग्न होत नाही. हा धर्म सभ्यता पुर्ण समाज असलेला धर्म आहे, असे त्या महिलेने म्हटले आहे.
मुस्लिम महिलेचे नाव सुलताना असे आहे, तिने सर्वांसमोर आपण हिंदू धर्म स्वीकारत असल्याची घोषणा केली आहे. तसेच तिने जय श्री रामच्या घोषणा सुद्धा दिल्या. ती महिला म्हणाली की, सनातन धर्म हा सर्वोत्तम धर्म आहे. कारण या धर्मात पती-पत्नीचे नाते तिहेरी तलाक बोलून संपत नाही.
महिलेचे असे वाक्य ऐकून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पुन्हा एकदा बाबांचा जयजयकार सुरु केला. महिलेने सांगितले की, तिने बाबांच्या दरबारात अर्ज केला होता. तेव्हा बाबांनी महिलेची समस्या तिला न सांगताच कागदावर लिहून दिली होती. बाबांचा हा चमत्कार पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला आणि तिने हिंदू धर्म स्वीकारला.
दरम्यान, शनिवारी ओडिशातील तिघांनी हिंदू धर्म स्वीकारण्याची घोषणा केली होती. बागेश्वर महाराजांनी मंचावरुन त्यांचे स्वागत केले होते. त्यांच्याकडे अनेक भक्त अर्ज करत आहे. ते त्यांच्या समस्या न विचारताच त्यांच्या समस्या कागदावर लिहून देत असल्याची चर्चा आहे. पण बागेश्वर बाबा अंधश्रद्धा पसरवत असल्याचे आरोप अनेकांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
भर दरबारात अचानक ढसाढसा रडू लागले बागेश्वर महाराज; शिष्याने सांगितले कारण
अशी वाईट वेळ कुणावरही येऊ नये; एकाच चितेवर दिला मुलगी-जावई अन् दोन नातवांना मुखाग्नी, अख्ख गावं हळहळलं…
‘मुसलमान असल्यामुळे सिकंदरसोबत…’; कुस्तीसम्राट अस्लम काझींच्या वक्तव्याने उडाली खळबळ!