Share

भर पावसात ‘मातोश्री’ समोर रात्रभर एकटाच उभा होता मुस्लिम शिवसैनिक, उद्धव ठाकरेंनी बोलावून…

एकनाथ शिंदे यांच्यासह ५१ आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आहे.(Muslim Shiv Sainik stood alone in front of ‘Matoshri’ all night in rain)

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत.काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला आहे. यादरम्यान ‘मातोश्री’ समोर एक व्यक्ती उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी हातात पोस्टर घेऊन भर पावसात उभा राहिला होता.

या व्यक्तीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या व्यक्तीचे नाव मोसिन अन्सारी असे आहे. मोसिन हा मुंबईतील मीरारोड परिसरात वास्तव्यास आहे. मोसिन अन्सारी हातात पोस्टर घेऊन उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी भर पावसात उभा होता. या पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो होता.

“वह एकता में विश्वास करता है, लेकिन कुछ बांटना और राज करना चाहते है, खुर्सीपर कोई भी बैठे, हमारे तो सीएम उद्धव बालासाहेब ठाकरे है, आय लव्ह यु सर, always in my heart, great CM”, असे त्या पोस्टवर मोसिनने लिहिले होते. उद्धव ठाकरे यांनी मोसिन अन्सारी या शिवसैनिकाला मातोश्रीवर बोलावून घेतले आणि त्याची विचारपूस देखील केली.

यावेळी शिवसैनिक मोसिन अन्सारीने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शिवसैनिक मोसिन अन्सारी म्हणाला की, “माझा कोणताही राजकीय हेतू नाही. मी उद्धव ठाकरे यांना मनापासून मानतो. आतच एका व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री या पदावर कोणीही बसलं, तरी माझ्यासाठी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत.”

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा !”, असं ट्विट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सैल कपडे, नो मेकअप लूक आणि बरंच काही… ; पहा गरोदर आलिया भट्टचे Unseen फोटो
माझा राग मुंबईवर काढू नका, शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर उद्धव ठाकरेंनी घेतला आक्षेप
राज ठाकरेंच्या फडणवीसांना ‘ठाकरी’ स्टाईलमध्ये शुभेच्छा; म्हणाले, वाटलं होतं, तुम्ही मुख्यमंत्री…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now