चालू किर्तनातच मुस्लिम किर्तनकार ताजूद्दीन महाराजांनी सोडला प्राण; पहा ह्रदय हेलावनारा व्हिडीओ

प्रसिद्ध मुस्लिम किर्तनकार ताजूद्दीन महाराज यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने पुर्ण वारकरी संप्रदायावर आणि त्यांच्या चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. नंदुरबार जवळ बाबा ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन चालू असताना चालू कीर्तनामध्ये तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावेते प्रमाण म्हणत असताना त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले.

किर्तन चालू असताना ते खाली बसले आणि तिथेच त्यांनी आपले प्राण सोडले. त्या किर्तनाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. कीर्तन चालू असताना भजन करताना मरण येणे हे साधूत्वाचे फार मोठे लक्षण आहे असे बोलले जाते. सोमवारी रात्री ते नंदुरबार येथे किर्तन करण्यासाठी गेले होते.

तुकोबा रायांना त्यांनी आर्त हाक मारली आणि तेव्हाच त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आला. तेथे बसलेल्या लोकांना काहीच कळाले नाही की अचानक महाराज खाली का बसले? पण नंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. तेथे बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांवर दुखाचा डोंगर कोसळला.

त्यांच्यावर रात्री उशीरापर्यंत उपचार सुरू होते पण त्यांनी रात्री २ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांनी वारकरी सम्प्रदायाचा पटका मराठी जनताजनार्धनाच्या हदयात कायम फडकत ठेवला होता. हिंदु मुस्लिम एकतेचा धडा त्यांनी पुर्ण समाजाला दिला होता. त्यांचा एक किस्सा खुप प्रसिद्ध आहे. खुप वर्षापुर्वी देवी दाक्षायणी मंदिर लासुरगाव येथे किर्तन सेवा सुरू असतांना महाराजांच्या आईचे निधन झाले होते.

त्यांना तातडीचा  निरोप आला होता  की तुमच्या आईचे निधन झाले आहे. निरोप आला तरी महाराजांनी खंड पडू न देता संपुर्ण किर्तन अत्यंत संयमाने  पार पाडले होते आणि शेवटी सगळ्यांचा निरोप घेऊनच ते गेले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने पुर्ण वारकरी संप्रदायावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

महत्वाच्या बातम्या
सिंधू नदी पुन्हा भारताचा भाग बनेल, अरबी समुद्राला सिंधूसागर हेच नाव योग्य- भगतसिंग कोश्यारी
नेहा कक्करला प्रेग्नंट बघून सासुलाही बसला धक्का! म्हणाली, एवढ्या लवकर गुड न्युज..
महाराष्ट्राच्या ‘या’ विभागावर चक्रीवादळ धडकणार; हवामान विभागाने सांगीतले ‘ही’ खबरदारी घ्या
माज किती आहे बघा, मुलासोबतच्या शाहरुख खानच्या व्हिडीओवर नेटकरी संतापले   

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.