हिंदू महीलेला मुस्लीम तरूणांनी दिला खांदा; कोरोनाच्या भितीने पोटची पोरं जवळही आली नाहीत

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात अनेक रुग्णांचा मृत्यु देखील होत आहे.

अनेक रुग्णांच्या मृत्युनंतर तर त्यांचे नातेवाईकही अंत्यसंस्कार करण्यास पळ काढत आहे. अशात अनेक लोकांनी माणूसकी जातीपेक्षा मोठी असते, असे दाखवून दिले आहे. आता अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे.

एका मृत्यु झालेल्या महिलेचा अंत्यसंस्कार करण्यासाठी पोटच्या मुलानेच नकार दिला आहे, त्यानंतर माणूसकीच्या खातीर मुस्लिम तरुणांनी हिंदू महिलेला खांदा दिला आहे. बिहारच्या चंपारण जिल्ह्यतील राणीगंज पंचायतीच्या तेतरीया गावात हि घटना घडली आहे.

दिग्विजय प्रसाद यांची ५८ वर्षांची पत्नी पार्वती देवी, कित्येक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. पण त्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती,असे मिळालेल्या अहवालात स्पष्ट झालेले होते.

त्यांच्या प्रकृतीत थोडा सुधार झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात येत होते, पण घरी येत असतानाच त्यांचा मृत्यु झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा आणि नातेवाईक घाबरले. त्यांना वाटत होते की या महिलेचा मृत्यु कोरोनामुळे झाला आहे.

त्यामुळे मृत झालेल्या महिलेचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. त्यानंतर मुस्लिम समाजातील रफिक, कलाम, ललित, लादेन आणि शरीक हे तरुण पुढे आले. त्यावेळी त्यांनी मृत महिलेच्या मुलाला मदत मागितली पण कोरोनाच्या भितीने त्याने येण्यास नकार दिला.

त्यानंतर मुस्लिम समाजातील त्या तरुणांनीच आधी तिरडी बांधली आणि नंतर हिंदू प्रथेनुसार अंत्यसंस्कार केले. कोरोनाच्या संकटात एकीकडे रक्ताची नाती साथ सोडताना दिसत आहे, तर अनेक लोक माणूसकीचे उदाहारण निर्माण करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

टाटांनंतर आता रिलायन्सही आले मदतीला धावून, मुंबईत ८७५ ICU बेडची करणार सोय
गर्लफ्रेंड घरी यायची आणि पत्नीसोबत मिळून माझ्यासाठी जेवण बनवायची; रवी किशनचा गौप्यस्फोट
परमबीर सिंहांवर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; पुराव्यासहीत पोलीस अधिकाऱ्याचे गृहमंत्र्यांना पत्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.