बोंबला! १० लग्न केल्यानंतरही झालं नाही मूल; शेवटी शेतात सापडला मृत अवस्थेत शेतकरी

उत्तर प्रदेशातील बरेली येथील भोजीपुरा भागातील एका व्यक्तीने १० हून अधिक लग्न केली होती. पण बुधवारी रात्री ५२ वर्षाच्या या व्यक्तीची ह.त्या करण्यात आली. जगनलाल यादव असे या व्यक्तीचे नाव आहे. या ह.त्येस जबाबदार कोण याचा तपास पोलीस करत आहेत.

जगनलालच्या सोबत २४ वर्षांचा एक तरुण राहात होता. त्याला त्याने दत्तक घेतलं असावं असा पोलिसांना संशय आहे. हा तरुण जगनलालच्या एका पत्नीचा पहिल्या पतीपासून झालेला मुलगा असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. जगनलालला कोटी रुपयांची वडिलोपार्जित संपत्ती मिळाली होती. हा व्यक्ती ही संपत्ती आपल्या सोबत राहणाऱ्या एका २४ वर्षीय व्यक्तीच्या नावावर ही संपत्ती ट्रान्सफर करणार होता.

जगनलाल हा सतत लग्न करत होता, मात्र त्याला मूल झाले नव्हते असं स्थानिकांनी सांगितले आहे. मूल नसल्याने त्याने २४ वर्षांच्या तरुणाला आपल्यासोबत ठेवले होते. जगनलालची हत्या अज्ञातांनी केल्याचं समोर आले आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

जगनलाल याने पहिलं लग्न ९० दशकाच्या सुरुवातीला केले होते. त्यांच्या ५ पत्नींचे आजारांतून मृत्यू झाला होता. तीन पत्नींनी त्याला सोडून दिलं आणि दुसऱ्या पुरुषांसोबत राहू लागली. आत्ता त्याच्या दोन पत्नी आहेत, ज्या पश्चिम बंगालच्या आहेत. जगनलालच्या या निर्णयामुळे त्याचे मोठे भाऊ नाराज होते.

याला म्हणतात नशीब! लॉटरी व्रिक्रेत्यालाच लागली बारा कोटींची लॉटरी

लग्नाला एक महिना झाल्यानंतर चहलने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला हिच्यासोबत…

नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत उडाली खळबळ; म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.