सोलापूरच्या तरुणाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनोखी ट्रॅक्टर सेवा; वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

मुंबई : दररोज पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दररोज पेट्रोलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. अशातच वाढत्या इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी आणखी अडचणीत आले आहेत.

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीला माढा तालुक्यातील वडशिंगे येथील मुन्ना साठे या तरुणानं मोठा निर्णय घेतला आहे. डिझेल टाका, शेतीची मशागत करा, अशा प्रकारे मुन्ना साठे हा तरुण अल्पभूधारक शेतकऱ्यांना सेवा देणार आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त वडशिंगे गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीची कामं मोफत करुन देण्याचा निर्णय घेतल्याछे साठे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या रानात मशागत करण्यासाठी नांगरणे, रोटर करणं यासाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करुन देण्यात आलाय. शेतकऱ्यांना यामध्ये फक्त डिझेल घालावे लागणार आहे, असं मुन्ना साठे यांनी सांगितले. सोलापूरच्या तरुणाने सुरु केलेल्या या अनोख्या ट्रॅक्टर सेवेचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवजयंतीच्या दिवशी मोफत मशागतीचा प्रारंभ केला. वडशिंगे गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ…
कार्यकर्त्यांचा चांदीच्या चपला, पॅशन बाईक देऊन केला सन्मान; पडळकरांच्या डोळ्यात अश्रू
शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो पाहिलात का? पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.