मुनमुन दत्ताच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आली समोर खुशखबर

टीव्हीची सर्वात लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकार ने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. याच मालिकेतील उत्कृष्ट अभिनेत्री बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता ही काही काळापासून बरीच चर्चेत पाहायला मिळते.

मागील काही दिवसांपूर्वी तिने जाती विषयक शब्दाचा वापर केला होता. यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये तिच्या विरुद्ध कारवाई केली होती. त्याच संदर्भात तिला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

शुक्रवारी १८ जूनला सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने ही कारवाई थांबवली आहे. त्यामुळे मुनमुनला दिलासा मिळाला आहे.

तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिने सांगितले होते की, ती लवकरच युट्युबवर पदार्पण करणार आहे. त्यासाठी तिला सुंदर दिसायचे आहे. याच व्हिडिओ दरम्यान तिने जातीविषयक शब्दांचा वापर केला होता. त्यामुळे अनेक लोकांनी आक्षेप घेतला होता.

या व्हिडिओ नंतर मुनमुनने सर्वांची माफी मागितली होती. तिने सोशल मिडीयावर लिहिले होते की, सर्वांनी त्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या या व्हिडिओमुळे अनेक विवाद निर्माण झाले आहे.

तिने पुढे लिहिले की, मला या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. परंतु जेव्हा मला समजले तेव्हा मी तो पार्ट काढून टाकला होता. मी प्रत्येक जातीचा आदर करते. मी त्या सर्वांची माफी मागते जे नकळत माझ्याकडून दुखवले गेले आहेत.

मुनमुन दत्ता म्हणजेच सर्वांची लाडकी बबिताजी अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम करत आहे. यामधील तिचे पात्र प्रेक्षकांना भरपूर आवडते. यामध्ये ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसते.

हे ही वाचा-

देवमाणूस मालिकेमधील एसीपी दिव्या सिंग घेणार प्रेक्षकांचा निरोप, देवी सिंगला फाशी कोण देणार?

तरुणांनाही लाजवेल असा भन्नाट डान्स करताय आजोबा; पहा आजोबांच्या ठुमक्यांचा व्हिडिओ

बॅंकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बॉलीवूडमध्ये नाव करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होत्या रिमा लागू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.