मुंबईतील महिलेचे भाजप आमदारावर गंभीर आरोप, विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

सध्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना घडत आहे. त्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनेचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे महिला सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. याच मुद्यावरुन राज्य सरकारवर भाजप नेते निशाणा साधताना दिसत आहे.

आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने भाजप आमदारावरच गंभीर आरोप केले आहे. इतकेच नाही, तर त्या महिलेने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित महिला ही मुंबईच्या जूहू परिसरात राहणारी आहे. या महिलेने भाजप आमदार अमित साटमवर गंभीर आरोप केले आहे. तसेच या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला विष पिताना दिसून येत आहे.

महिलेने पोलिसांवर आणि भाजप आमदार अमित साटम यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच एक सुसाईड नोटही लिहीली आहे. आरोप केल्यानंतर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या महिलेवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आज मी आत्महत्या करतेय. पोलिसांनी मला खुप त्रास दिला आहे. माझ्या मुलांचाही विचार केला नाही. त्यांच्यावर खोटी केस केली. मी विष पिऊन आत्महत्या करतेय. माझ्या मृत्युला संजय कदम, अमित साटम जबाबदार आहे. संध्याकाळपासून मी बसले होते. मला न्याय हवा आहे, असे त्या महिलेने म्हटले आहे.

तसेच माझ्या मृत्युनंतर माझ्या कुटुंबाला न्याय मिळून द्यावा, असे त्या महिलेने म्हटले आहे. महिला ही काही वर्षांपासून जूहूमध्ये राहत आहे. अशात त्या महिलेने भाजप आमदार अमित साटमवर आरोप केल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: मलायका अरोराची चाल पाहून लोकांनी केले ट्रोल; म्हणाले, हिला मुळव्याध झालेला दिसतोय
कोण आहे स्नेहा दुबे जिने संयुक्त राष्ट्रांच्या सभेत इम्रान खान यांना झाप झाप झापले?
‘अजित पवार अशी व्यक्ती आहे जी स्वतः काहीच करत नाही पण बोल बच्चन भारी’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.