काही दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात(Maharashtra) दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या सोमवारी मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील मान्सूनच्या आगमनाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सूनमध्ये १७ दिवस भरती येणार आहे.(Mumbai will be flooded six times this month; Meteorological Department Alert)
तसेच जून महिन्यात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यावेळी मुंबईत अतिवृष्टी होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. या अतिवृष्टीमुळे तब्बल ६ वेळा मुंबई पाण्याखाली जाऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे मुंबईकरांना जून महिन्यात सतर्क राहावे लागणार आहे.
पावसाळयात सुमारे १७ वेळा साडे चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. या लाटांमध्ये पाण्याची उंची जास्त असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणा तातडीने कामाला लागल्या आहेत. यासंदर्भात प्रशासन यंत्रणांच्या मार्फत पूर्वतयारी करण्यात येत आहे.
या भरतीचा फटका फक्त मुंबईला बसणार नसून कोकण किनारपट्टीला देखील त्याची झळ पोहचणार आहे. या लाटांमुळे कोकण किनारपट्टीचा भाग पाण्याखाली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवबाग किनारपट्टीला अतिवृष्टीचा धोका असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या मान्सून झपाट्याने भारताच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी अपक्षेपेक्षा लवकरच मान्सून भारतात दाखल होणार आहे. अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर दहा दिवसांमध्ये तो महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.
जून महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा मुंबईला बसणार असून नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. यंदा मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण देखील चांगले असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या आगमनाने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
उर्मिलासोबतच्या नात्यावर महेश कोठारेचा मुलगा आदिनाथने केला मोठा खुलासा; म्हणाला, सोशल मीडियावर….
अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने कॅमेऱ्यासमोरच काढले सगळे कपडे, व्हिडीओने उडाली खळबळ; पहा व्हिडीओ
आनंद दिघेंच्या मृत्यूचा सीन न पाहताच मुख्यमंत्री चित्रपटगृहाबाहेर; जाणून घ्या नेमकं काय घडलं…