Share

मोठी बातमी! मुंबई सत्र न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला जामीन मंजूर

मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Mumbai Sessions Court grants bail Rana couple)

राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्यावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी राणा दाम्पत्याला सुरवातीला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयाकडून राणा दाम्पत्याच्या कोठडीमध्ये वाढ देखील करण्यात आली होती. खासदार नवनीत राणा यांना भायखळा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. तर आमदार रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

या प्रकरणात राणा दाम्पत्याने गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. राणा दाम्पत्याने यासंदर्भात एक याचिका देखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. पण गुन्हा रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

गेल्या आठवड्यामध्ये या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली होती. पण मुंबई सत्र न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज या प्रकरणात राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची आजच तुरुंगातून सुटका होणार आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाकडून प्रसार माध्यमांशी संवाद साधण्यास बंदी करण्यात आली आहे

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी एकत्र येत हनुमान चालिसा पठण केले होते. आता राणा दाम्पत्याची सुटका झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मनसैनिकांनी केले राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन, राज्यात ठिकठिकाणी पहाटे हनुमान चालिसाचे पठण
शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर अभिनेत्रीचे खळबळजनक आरोप, म्हणाली, ‘माझी व्हर्जिनिटी विकून सोनाक्षी स्टार बनली’
‘आई वडील करत आहेत फोन, पण मी ९ वर्षांपासून घरी गेलो नाही’, वाचा कुमार कार्तिकेयचा संघर्षमय प्रवास

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now