Share

रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत वाढ, १० रुपयांऐवजी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

मुंबईतून रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून मध्य रेल्वेने मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रेल्वे(Railway) प्लॅटफॉर्म तिकिटासाठी १० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खिशाला कात्री लागणार आहे.(mumbai railway paltform tickiet increased by 40 rupees)

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शिवाजी सुतार यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार सीएसटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांमधील प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

आता या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिट ५० रुपये असणार आहे. ही दरवाढ फक्त १५ दिवसांकरिता असणार आहे. ९ मे ते २३ मे या तारखेपर्यंत ही दरवाढ असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे स्थानकांच्या परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. साधारणतः अलार्म चेन पुलिंगच्या ३३२ घटना घडल्या आहेत.

या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत अलार्म चेन पुलिंग करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९४ हजार इतकी रक्कम दंडाच्या मार्फत वसूल करण्यात आली आहे. अलार्म चेन पुलिंगच्या घटना कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकतीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईतील एसी लोकल गाड्यांचे भाडे ५० टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली होती. यामुळे ५ किमी अंतरासाठी एसी गाड्यांचे किमान भाडे ६५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात येणार आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोषणेमुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे.

मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ८० एसी लोकल धावतात. डिसेंबर २०१७ मध्ये मुंबईत पहिल्यांदा एसी लोकल ट्रेन सुरू झाली होती. ही भारतातील पहिली एसी लोकल ट्रेन होती. मुंबईतील पहिली एसी लोकल ट्रेन बोरिवली-चर्चगेट या मार्गावर धावली होती. सुरवातीला एसीचे लोकलचे सिंगल प्रवास भाडे ६५ ते २४० रुपये होते. पण आता यामध्ये कपात करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षातून लढणार निवडणूक
‘या’ महिन्यात सुरू होणार KGF 3 चे शुटिंग, मार्व्हल युनिव्हर्सप्रमाणे रॉकीचीही फ्रँचायझी येणार
… अन् बूट काढून सलमानने केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन, व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now