मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील मैदानात

मुंबई | तुम्ही अनेकदा मुंबईतल्या चौकाचौकात किंवा सिग्नलवर भिक्षा मागणारे भिकारी पाहिले असतील. याचबरोबर खूप वेळा तुम्ही त्यांना मदतही दिली आहे. मात्र आता मुंबईत भिक्षा मागणारे भिकारी आता दिसणार नाहीत. याचे कारण असे की, मुंबई पोलिसांनी भिकाऱ्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे.

आता लवकरच “भिक्षेकरी पकड मोहीम” मुंबई पोलिसांकडून राबविण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत रस्त्यांवरील भिकऱ्यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांनची कोविड चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.

या मोहीम अंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवरील भीक मागणाऱ्या लोकांना मुंबई पोलीस ताब्यात घेणार आहे. फेब्रुवारी पासून या मोहिमेला सुरवात करण्याचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेश दिले आहेत. याचबरोबर त्यांची करोना चाचणी करून त्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, अलीकडेच लहान मुलांचा वापर करुन सहानभुती मिळवून पैसे कमावणाऱ्यांची भिकाऱ्यांची टोळी मुंबईत विकसीत झाल्याचे समोर आले आहे. तसेच, अनेक लहान मुलांचं अपहरण करुन त्यांना भिक मागायला लावण्याचे प्रकारही घडतात. यामुळे मुंबई पोलिसांनी याविरोधात मोहीम सुरू केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत; होणाऱ्या नवऱ्याला आहे एक मुलगी
‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपूडा; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का
…म्हणून ‘त्या’ बस कंडक्टरनं सोशल मीडियावर विकायला काढली स्वत:ची किडनी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.