मुंबई पोलीस आयुक्तांचे जनतेला आवाहन, शक्य झाल्यास पोलीसांना चहा, जेवण द्या

मुंबई । राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामुळे आरोग्य कर्मचारी, पोलीस याच्यांवर मोठा ताण आला आहे. एका लाखापेक्षा जास्त रुग्ण रोज आढळत आहेत. अनेकांना आता बेड्स देखील उपलब्ध नाहीत. यामुळे लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदी असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसत आहेत. आता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, पोलिसांना शक्य तेवढी सगळी मदत करा, चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवणही त्यांना द्या. त्याच्याकडे नाही असे नाही, पण आपली आपुलकी समोर येईल, असे म्हणत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.

या लढाईत पोलिस महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना अनेक दिवस सुट्टी देखील मिळत नाही. ते सुद्धा कोरोना योद्धा आहेत. या लढाईत अनेक पोलीस कर्मचारी देखील मृत्युमुखी पडले आहेत. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी ते म्हणाले, नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावे. रस्त्यावर कोणी यावे कोणी नाही, ह्याबाबत सूचना दिली गेली आहे. कोरोना यंदा भयंकर आहे. जे दिलेल्या सूचना पाळत नाही, उगाच बाहेर येत आहेत ते योग्य नाही. पोलीस सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.