‘मुंबईत आता कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही’

 

मुंबई | मुंबईतील कोरोनाचे संकट हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

आता मुंबईतील अधिकाधिक कोरोना रुग्ण शोधता येऊन त्यांच्यावर उपचार करता येण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

तसेच आता यापुढे कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज लागणार नाही, असा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी घेतला आहे.

तसेच हा आदेश जाहीर करताना दैनंदिन चाचण्यांची संख्या किमान दोन हजारांनी वाढवण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधितांना दिले आहे.

दरम्यान, मुंबईतील चाचणी केंद्राची क्षमता दहा हजार ते बारा हजार एवढी आहे, पण प्रत्यक्षात गेले कित्येक दिवस सरासरी रोज चार ते साडे चार हजार चाचण्या होत असून यात रोज बाराशे ते पंधराशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.