मुंबईच्या रुग्णालयाचा भोंगळ कारभार! आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला उंदराने कुरतडले

कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाच्या अनेक घटना समोर आल्या होता.आता अशीच एक बातमी मुंबईच्या रुग्णालयातून समोर आली आहे. मुंबईच्या राजवाडी रुग्णालयात आयसीयुमध्ये एका रुग्णाचा उंदराने चावा घेतला आहे.

या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहे. रुग्ण व्हेंटिलेटवर असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच त्याला ताप आला होता आणि त्याच्या किडनीमध्ये दुखत होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उंदरामुळेच रुग्णांच्या डोळ्यांचे नुकसान झाले आहे. संबंधित रुग्णाचे नाव नागेश यलप्पा असे आहे.

रुग्णाच्या डोळ्यांना त्रास झाला असला तरी रुग्णाला व्यवस्थित दिसत आहे, असे रुग्णालयाचे सुप्रिडंट विद्या ठाकुर यांनी म्हटले आहे. रुग्णाच्या पत्नीने या सर्व घटनेचे फोटोही दाखवले आहे. हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येते.

मंगळवारी मी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बघितली आणि जमिनीवर रक्त पडलेले दिसले. नर्सने सांगितले की त्यादिवशी फक्त दोन लोक ड्युटीवर होते आणि आयसीयुनुसार हे लोकं खुप कमी होते. या घटनेनंतर मला सिक्योरीटी गार्डने मला रुग्णालयाच्या बाहेर काढले होते, असे रुग्णाची पत्नी यशोदा यलप्पा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधीही अशाच प्रकारची एक घटना घडली होती. २०१७ मध्ये कांदिवलीमध्ये असणाऱ्या शताब्दी रुग्णालयामध्ये उंदरांनी दोन रुग्णालयांना कुरतडले होते. रुग्णालयाच्याच एका कर्मचाऱ्याने या घटनेबद्दल सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या-

सावधान! ‘हे’ पदार्थ खात असाल, तर होऊ शकतात तुम्हाला गंभीर आजार; आजच करा बंद
काँग्रेसच्या सरकारमुळेच भारतातील पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे; केंद्रीय मंत्र्याने सांगितले कारण
तरुणीला अंघोळ करताना दिसलं असं काही कि अचानक लागली ओरडू, पहा हा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.