मुंबई पालिकेचे कौतुक करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला झाप झाप झापले, म्हणाले..

मुंबई । सध्या कोरोना महामारी अधिक तीव्र होत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या शहरांत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. अनेक गोष्टींमध्ये प्रशासन देखील अपयशी ठरत आहे. रुग्णांना ऑक्सिजन, बेड देखील उपलब्ध होत नाहीत.

आता दिल्लीमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असताना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने केलेल्या वक्तव्याबाबत केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले की, दिल्लीची ऑक्सिजन मागणी पूर्ण करण्यासाठी आपण काय योजना आखत आहात? दिल्लीतील कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी मुंबई महापालिकेने चांगले काम केले आहे, त्यांच्या मॉडेलकडे पाहा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अधिकाऱ्यांना दिला.

कोरोना काळात मुंबई महानगरपालिका चांगले काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत असताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवण्याबाबत नोटीस बजावल्याचा प्रकार दुर्दैवी आहे, असे केंद्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत देखील कोरोना परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसीवीर इंजेक्शन, मिळत नाही. अनेकांचे यामुळे मृत्यू होत आहेत.

या काळात मात्र मुंबई महानगरपालिका चांगले काम करत आहे. लोकसंख्या जास्त असून देखील काम चालू आहे. यंत्रणा अपुरी असली तरी आहे त्या परिस्थितीमध्ये काम केले जात आहे. कोरोना रुग्णांचा आलेख देखील कमी होत आला आहे.

ताज्या बातम्या

VIDEO: पोलिसांसमोर तरुणीचा भररस्त्यात ड्रामा; मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनाही सुनावले खडे बोल

‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने हिंदी गाण्यावर केली भन्नाट लावणी; व्हिडिओ पाहून चाहते घायाळ

VIDEO: धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला; काचा फोडल्या अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.