घर घेण्याची सुवर्णसंधी! मुंबईत १५ लाखांमध्ये मिळतोय ५५७ स्क्वेअर फुटांचा फ्लॅट; जाणून घ्या प्रक्रिया

प्रत्येकालाच आपल्या हक्काचं घर असावं अशी इच्छा असती, पण सध्याच्या महागाईमुळे घरही कमी किंमतीत मिळणे शक्य होत. मुंबईत तर घरांच्या किंमती ५० लाखांच्यावर गेल्या आहे. पण आता सर्व सामान्यांनाही मुंबईत घर विकत घेण्याची संधी मिळत आहे.

मुंबईपासून काहीच किलोमीटरच्या अंतरावर १५ लाखांमध्ये घरं मिळत आहे. काही ठिकाणी तर अगदी दहा लाखांमध्ये सुद्धा घर मिळत आहे. विशेष म्हणजे या घरांची विक्री करणारी संस्था खुपच वर्षांपासून असून ती पुर्णपणे विश्वासार्ह आहे.

मुंबईपासून जवळ असलेला आणि अगदी चांगल्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या या १० ते १५ लाखांमधील घरांचा बिल्डअप एरिया हा ५५७ स्क्वेअर फुट इतका आहे. अशाचप्रकारे ६९८ स्क्वेअर फुट असणारी घरं १८ लाख ८४ हजार रुपयांमध्ये भेटत आहे.

तसेच ३७० स्क्वेअर फुटांचे घर हे अवघ्या ९ लाख ९८ हजार रुपयांमध्ये भेटत आहे. वरील सर्व घरं हे ठाण्यातील घोडबंदर भागात उपलब्ध आहे. या घरांची विक्री म्हाडाच्या माध्यमातून केली जाणार आहे. म्हाडाच्या कोकण बोर्डाकडून या घरांची विक्री केली जाणार आहे. ८ हजार ९८४ घरं विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ठाणे, कल्याण, वसई, विरार, मीरा-भाईंदर ही घरं आहेत. मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असतो. पण गेल्या दोन वर्षांपासून मुंबई मंडळाची, तर तीन वर्षांपासून कोकण मंडळाची सोडत निघाली नव्हती, त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात ही सोडत निघाली आहे.

१४ ऑक्टोबरला ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑनलाईन पद्धतीने सोडत काढण्यात येणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत या ८ हजार ९८४ घरांसाठी २६ लाखांहून अधिक अर्ज आले आहे.

दरम्यान, २३ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून नोंदणीस सुरुवात झाली आहे. ही नोंदणी २२ सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर नोंदणीची प्रक्रिया बंद होणार आहे. पुढे नोंदणी केल्याल्यांनाच २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! ठाकरे सरकारने केला चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त, कोकणाला दिले ३ हजार कोटींचे पॅकेज
पोलीस नव्हे देवता! पोलीसाने भाजीविक्रेत्यासोबत जे केले ते पाहून तुम्हीही हेच म्हणाल
महीला पोलीस ओळख लपवून साध्या कपड्यांवर बस स्टॉपवर बसली; टवाळखोरांनी छेडताच असा धडा शिकवला की..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.