मुंबईतील हॉटेलवर महापौरांनी टाकली धाड; हॉटेलने लसींसोबत आराम करण्याची दिली होती ऑफर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. आरोग्य व्यवस्थेत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि कोरोना लस यांचा खूप मोठा तुटवडा जाणवत आहे. या तुटवड्यामध्ये पण काही जण संधी शोधतांना दिसून येत आहेत.

मात्र आता लसीकरणाबाबत पण मोठ्या प्रमाणावर तुटवडा दिसत आहे. लसीकरणाबाबत पण वेग वेगळ्या गोष्टी आता समोर येताना दिसून येत आहेत. काही हॉटेलने लस घ्या आणि आमच्याकडे आराम करा अशा ऑफर दिल्या आहेत.

मुंबातील अंधेरी येथील ललित हॉटेलने अशीच एक स्कीम आणली आहे. यात त्यांनी लसींसोबतच आरामाचा सोयीचा पण समावेश केला आहे. या हॉटेलवर आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी धाड टाकली आहे.

या हॉटेलने त्यासाठी पॅकेज पण ठेवले असल्याचे दिसून आले आहे. या हॉटेलने त्यासाठी तब्बल ३५०० ते ४००० रुपये तिकीट ठेवले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरला होता.

ओशाळ मीडियावर पण हे मोठ्या प्रमाणावर पसरले. त्यामुळे लोकांमध्ये पण मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे त्यावर अंमलबजावणी म्हणून किशोरी पेडणेकर यांनी या हॉटेलवर छापा घातला आहे.

बाहेर कोरोना लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असूनही एका हॉटेलने अशी ऑफर देणे चुकीचे आहे. सोशल मीडियावर या हॉटेलचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या
मेडिकल माफियांनी अमीर खानच्या विरोधात मोर्चा काढावा; बाबा रामदेव यांनी दिले आव्हान

सिंहाच्या आणि बिबट्याच्या लढाईत बिबट्याला वाचवायला आला हत्ती, पहा मग पुढे काय झालं..

अभिनेत्री शिल्पा शिंदेनी बदलली फिल्ड; आता करतेय कंस्ट्रक्शन साईटवर काम, पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.