लोकल सेवेच्या वेळापत्रकात होणार बदल? राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा

मुंबई | ठाकरे सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी अखेर सुरू करण्यात आली. पण प्रवासासाठी काही वेळा निर्धारित करुन देण्यात आल्या आहेत.

सर्वसामान्यांना सकाळच्या वेळी पहिल्या लोकलपासून ते पहाटे सात वाजेपर्यंतच प्रवास करण्याची मुभा असल्याने नोकरदार वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे लोकलच्या वेळा बदलण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता असून तसे संकेत दिले आहेत.

याबाबत ते मध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘लोकांचं हित आणि गरज पाहून सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकल सेवेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येतील”, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले आहे.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, ‘लोकलची व्यवस्था ही सर्वांसाठीच अतिशय महत्वाची आहे. लोकलच्या वेळात काही सुधारणा होण्यासारखी असेल तर नक्कीच आमच्या विभागाकडून आम्ही याचा पाठपुरावा करू,’ असेही राजेश टोपे म्हणाले.

वाचा सर्वसामान्यांसाठी काय आहेत लोकलच्या वेळा?
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

महत्त्वाच्या बातम्या
कंगणा राणावत हाजीर हो; ‘या’प्रकरणात पुन्हा अडकली वादाची राणी
…अन् मध्यरात्री नाईट ड्रेसमध्येच नागरिक आले कोरोना लस घ्यायला; कारण वाचून बसेल धक्का
पतंजली देणार पाच लाख तरुणांना रोजगार; बाबा रामदेव यांची घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.