‘’मुंबईचा कर्नाटकात समावेश होत नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा’’

मुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच कर्नाटकातील बेळगाव, कारवार आणि निपाणीसह वादग्रस्त सीमाभाग प्रकरण न्यायलयात प्रलंबित असेपर्यंत हा परिसर केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी केली आहे. यावर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला कर्नाटक राज्यात सामील करण्याची मागणी केली आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते, यावेळ याप्रकरणी मुंबईचा समावेश कर्नाटकात करावा, अशी मागणी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच स्वातंत्र्यापूर्वी कर्नाटकातला बराचसा भाग मुंबई प्रांतात होता. त्यामुळे मुंबई कर्नाटकला मुंबई-कर्नाटक असे म्हणतात. असा तर्क सवदींनी मांडला आहे.

‘’बेळगावसह सीमाभाग कर्नाटकाचाच आहे. हे न्यायालयात सिद्ध होईल. त्याशिवाय मुंबईसुद्धा कर्नाटकाची आहे. ती मागणी लावून धरू’’. असे वक्तव्य लक्ष्मण सवदी यांनी केल आहे.

पुढे ते म्हणाले, ठाकरे हे वारंवार बेळगाव महाराष्ट्रात घेण्याचे बोलत आहेत. त्यासाठी ते मराठी भाषिक लोकांचा आधार घेत आहेत. मात्र मुंबई प्रांत हा पूर्वी कर्नाटकात होता. त्यामुळे महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी. तसेच बेळागाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा चॅप्टर लवकरच क्लोज करणार असल्याचे विधान कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले आहेत.

राजकीय नेत्यांच्या विधानांमुळे सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप लावले जात आहेत. याप्रकरणी वाद घालण्यापेक्षा सीमा भागातील लोकांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला हवे. न्यायालयकडून योग्य निकाल येईल. त्याआधीच राजकीय नेतेमंडळी अशाप्रकारची वक्तव्य करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
भाजपच्या वेबसाईटवर खा. रक्षा खडसेंचा लाजिरवाना उल्लेख; वाचून तुम्हालाही संताप येईल
आंदोलन चिघळवणाऱ्या भाजपच्या दीप सिंधुला शेतकऱ्यांनी पळवून लावले; पहा व्हिडीओ
बॉलीवूडमध्ये स्टार किड्सला लाँच करण्यासाठी करण जोहर घेतो ‘एवढे’ पैसे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.