Share

Mumbai Kabutar Khana News : “कबुतरांना दाणे टाकू नका” म्हणणं महागात पडलं, मीरा-भाईंदरमध्ये वृद्ध वडील आणि मुलीला लोखंडी रॉडने मारहाण

Mumbai Kabutar Khana News : मुंबईत महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांवर कारवाईला वेग दिला आहे. अनेक ठिकाणी कबुतरखाने बंद करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात एक धक्कादायक घटना घडली. कबुतरांना दाणे टाकू नका असा सल्ला दिल्याने ६९ वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या मुलीवर हल्ला करण्यात आला.

ही घटना रविवारी मीरारोड (Mira Road) येथील ठाकूर मॉलजवळील डीबी ओझोन इमारतीत घडली. महेंद्र पटेल (Mahendra Patel) दूध आणून परत इमारतीजवळ आले असताना, शेजारील इमारतीत राहणाऱ्या आशा व्यास (Asha Vyas) कबुतरांना दाणे टाकत होत्या. पटेल यांनी त्यांना असे करू नका, असे सांगितले. यावरून व्यास यांनी त्यांच्यावर शिवीगाळ केली. गोंधळ ऐकून पटेल यांची मुलगी प्रेमल पटेल (Premal Patel) खाली आली आणि व्यास यांना जाब विचारला.

थोड्याच वेळात व्यास यांच्या इमारतीतील सोमेश अग्निहोत्री (Somesh Agnihotri) दोन जणांसह आला. त्याने लोखंडी रॉडने प्रेमल पटेल यांना मारहाण केली, तर दुसऱ्याने त्यांच्या गळ्यावर दबाव आणला. या घटनेनंतर काशीमीरा पोलीस ठाण्यात सोमेश अग्निहोत्री, आशा व्यास आणि इतर दोन जणांविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे.

कबुतरखाने बंद, पक्ष्यांची वाढती धावपळ

मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) झाकल्यामुळे कबुतरांना आत बसण्याची जागा नाही. त्यामुळे ही पक्षी गर्दी रस्त्यांवर, दुकाने आणि इमारतींवर होत आहे. काही पक्ष्यांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. पूर्वी कबुतरांना आत खायला मिळत असल्याने ते रस्त्यावर कमी पडत होते, मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे.

जैन समाजाची नाराजी, मंत्र्यांची भूमिका

कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनीही भूमिका घेत सांगितले की, कबुतरखान्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय ते बंद करू नयेत. कबुतरं नॉनव्हेज खात नाहीत, पडलेलं खात नाहीत, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांना मरू देणे चुकीचे आहे, हे आमचे नैतिक कर्तव्य आहे. लोढा यांनी सुचवले की, रेसकोर्स, बीकेसी, कोस्टल रोडवरील गार्डनसारख्या कमी वस्तीच्या भागात कबुतरांची व्यवस्था करावी.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now