Share

मुंबई इंडीयन्सने जिंकली पहीली WPL ट्रॉफी; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात दिल्लीला हरवले

WPL फायनल: महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याने क्रिकेट चाहत्यांना बई इंडियन्सच्या अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीचा पराभव करत पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने 131 धावांची मजल मारली. त्यामुळे मुंबईला 132 धावांचे लक्ष्य मिळाले. जे साध्य करण्यासाठी त्यांना चांगलाच घामही गाळवा लागला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात मुंबईने ३ चेंडू राखून १३२ धावांचे लक्ष्य गाठले.

महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल फायनल) च्या पहिल्या सत्रात, फलंदाजीतील कोणती फळी गोलंदाजांना सर्वात जास्त घाबरवू शकते, तर ती दिल्ली कॅपिटल्स होती. मात्र शेवटच्या सामन्यात एकाही फलंदाजाला लौकीकाला साजेशी प्रभावी खेळी करता आली नाही.

डावाच्या दुसऱ्याच षटकात शेफाली वर्माच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. पुढच्या 2 चेंडूत म्हणजे 1.5 षटकात, तुफानी शैलीत फलंदाजी करणारी अॅलिस कॅप्सीही बाद झाली. यानंतर जेमिमा आणि मेग लॅनिंग यांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांची भागीदारी अवघ्या 23 धावांवर आटोपली. यानंतर कर्णधाराला मेरीजन कॅपने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. पण 10.3 षटकात एमिलिया केरने आक्रमणात आल्यावर सर्व काही बदलून टाकले.

तिने कार्पला बाद केले. त्यामुळे वाढत्या दबावाखाली मेगही धावबाद झाली. मेग लॅनिंग आणि मारिजन कॅप या दोन दिग्गज खेळाडूंना गमावल्यानंतर दिल्लीचा डाव पूर्णपणे विस्कळीत झालेला दिसत होता. 74 ते 79 च्या स्कोअरमध्ये कॅपिटल्सने 4 विकेट गमावल्या.

ज्यामध्ये अरुंधती रेड्डी, जेस जोनासेन, मिन्नू मन्नी आणि तानिया भाटिया यांच्या विकेट्सचा समावेश होता. मात्र, शेवटी शिखा पांडे आणि राधा यादव यांच्यात 52 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान शिखाने 17 चेंडूत 27 धावा केल्या तर राधाने 12 चेंडूत 27 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला 20 षटकांत 131 धावा करता आल्या.

132 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी मुंबईला चांगलेच सतावले. अनुभवी जेस जोनासेनने डावाच्या दुसऱ्या षटकात यस्तिका भाटियाला पायचीत केले. नंतर चौथ्या षटकात मुंबईकडून वेगवान धावा काढणारा हेली मॅथ्यूजही राधा यादवचा बळी ठरली.

अवघ्या 23 धावांच्या स्कोअरवर 2 गडी गमावल्यानंतर मुंबई या लक्ष्यात पूर्णपणे मागे दिसत होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंतिम सामन्याचे दडपणही सतत धावांच्या गरजेचा वेग वाढवत होते. अशा परिस्थितीत हरमनप्रीत कौरने अनुभवी सिव्हर ब्रंटसोबत भागीदारी रचण्यास सुरुवात केली.

सायव्हर-ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी मुंबईचा डाव सांभाळला. त्यांनी 39 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. शेवटी नॅट सायव्हर-ब्रंटने झंझावाती अर्धशतक झळकावून मुंबईला विजय मिळवून दिला. तिने 55 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 60 धावा केल्या तर केर 14 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. दिल्लीकडून राधा यादव आणि जेसने १-१ विकेट घेतली.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now